जिल्हा कबड्डी असोसिएशन तर्फे आमदार सुहास आण्णा कांदे यांचा सत्कार

0

मनमाड : नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन चे पदाधिकारी यांनी आमदार संपर्क कार्यालय मनमाड येथे आमदार सुहास आण्णा कांदे कांदे यांचा सत्कार केला. मागील हप्त्यात मनमाड शहरात आमदार कबड्डी चषक भरविण्यात आला व या स्पर्धेस उदंड प्रतिसाद मिळाला. आमदार सुहास आण्णा कांदे यांनी या स्पर्धेसाठी 5 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्यामुळे या स्पर्धेचे उत्तम नियोजन शक्य झाले आणि मोठ्या प्रसादात या स्पर्धा पार पडल्या, या नंतर आमदारांच्या व्यस्त नियोजनामुळे भेट होऊ शकली नव्हती म्हणून शनिवार रोजी संपर्क कार्यालय येथे कबड्डी असोसिएशन चे सर्व पदाधिकारी यांनी आमदारांची भेट घेतली. नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेंद्र पगारे प्रमुख कार्यवाहक मोहन गायकवाड, सतीश सूर्यवंशी, अशोक गरुड, वाल्मीक बागुल, राजेश निकुंभ, महेंद्र वाघ यांनी या वेळी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देत आमदारांचे आभार व्यक्त करत सत्कार केला. या प्रसंगी आमदारांनी लवकरच मनमाड स्टेडियम दुरुस्ती व नूतनीकरणासाठी 5 कोटी रुपये निधी उपलब्ध झाला असू त्याचे भूमिपूजन करण्यात येणारं आसल्याचे सांगितले, या मुळे मनमाड शहरातील सर्व क्रीडा प्रेमींना सर्व सुविधा उपलब्ध होणार असल्याने त्यांची गैरसोय दूर होईल अशी माहिती दिली. या प्रसंगी तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे,राजाभाऊ भाबड, वाल्मीक आंधळे, लाला नागरे, सादिक तांबोळी, दिनेश घुगे आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here