
दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांनी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले.यावेळी लवकर निदान करणे, अपंगत्व आणि व्यंग रोखण्यासाठी मोफत उपचार तसेच सध्या कुष्ठरोगामुळे व्यंग असलेल्यांचे वैद्यकीय पुनर्वसन यावर कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम लक्ष केंद्रित करतो. व्यंग दूर करणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी कल्याण भत्ता 8,000 रुपयांवरून 12,000 रुपये करण्यात आला आहे,” अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाबाबत दिली.
कुष्ठरुग्ण दर 2014-15 मध्ये 0.69 प्रति 10,000 लोकसंख्येवरून 2021-22 मध्ये 0.45 वर आला आहे. दरम्यान, प्रति 100,000 लोकसंख्येचा वार्षिक नवीन रुग्ण निदान दर 2014-15 मधील 9.73 वरून 2021-22 मध्ये 5.52 वर आला आहे, असे त्यांनी कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या यशस्वीतेवर प्रकाश टाकताना सांगितले.यावेळी देशव्यापी जनजागृती मोहिमे अंतर्गत कुष्ठरोगाशी निगडित मानसिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी डॉ. भारती प्रवीण पवार यांनी एक चित्रफीतही जारी केली.
