
मुंबई : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील संसद सदस्यांची बैठक मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे संपन्न झाली. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या महत्वाच्या प्रस्तावाबाबत व केंद्र सरकार यांचेकडील नवीन प्रकल्प तसेच विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली.याप्रसंगी केंद्रीय मंत्री नारायणजी राणे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती प्रविण पवार, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड,केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, राज्य मंत्रीमंडळातील कॅबिनेट मंत्री महोदय तसेच महाराष्ट्रातील सर्व लोकसभा सदस्य उपस्थित होते.
