सार्वजनिक शिवजयंती च्या अध्यक्ष पदी आमदार सुहास आण्णा कांदे तर कार्याध्यक्षपदी मयूर बोरसे यांची निवड

0

मनमाड : सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची बैठक काल हिरूभाऊ गवळी मंगलकार्यालय मनमाड येथे संपन्न झाली. या मध्ये मनमाड च्या इतिहासात पहिल्यांदाच कोणी लोकप्रतनिधी यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली ही विशेष बाब आहे. सन 2022 चे शिवजयंती उत्सव अध्यक्ष काय्याम सैयद यांनी या बैठकीचे आवाहन केले होते, या प्रसंगी सर्व पक्षाचे पदाधिकारी, सर्व समाज बांधव व मनमाड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन वर्ष आधी कोविड मुळे शिव जयंती साजरी करता आली नाही तर मागील वर्षी नियम अटी पाळत साजरी झाली होती. या वर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी व्हावी अशी ईच्छा सर्वांनी व्यक्त केली. आमदार सुहास आण्णा कांदे यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले.आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून आपल्याला सर्व समावेशक लोक प्रतिनिधी मिळाले आहेत, सर्व जाती पंथाला सोबत घेऊन चालतात, मोठ्या प्रमाणात विकासाचा धडाका त्यांनी लावलेला आहे, आपल्यातला आपला माणूस म्हणून त्यांनी स्वतची ओळख निर्माण केली आहे आणि म्हणून बैठकीत उपस्थितांनी आमदारांनी या वर्षीच्या शिवजयंती अध्यक्ष पद भूषवावे असा आग्रह धरला, सर्वांच्या आग्रहाचा मान ठेवत आमदार सुहास आण्णा कांदे यांनी अध्यक्ष पद स्वीकारले. तर कार्याध्यक्ष पदी मयूरभाऊ बोरसे यांची निवड करण्यात आली.आमदार सुहास आण्णा कांदे यांनी यावेळी या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले, या मध्ये माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे, बबलुभाऊ पाटील, साईनाथभाऊ गिडगे, मावळते शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष कयाम सय्यद, रवींद्र घोडेस्वार,सचिन दराडे, राजाभाऊ भाबड,जय फुलवाणी, गंगादादा त्रिभुवन,सादिक तांबोळी, फिरोज शेख, नितीन पांडे, पंकज खताळ, सुनील साळवे,महेंद्र शिरसाठ,नाना शिंदे, यांनी या वर्षी शिवजयंतीचा मोठ्या उत्साहात साजरी करावी, मनमाड रण, सांस्कृतिक कार्यक्रम,आयोजित करण्याचा सूचना केल्या. दोन वर्षांपासून कोविड मुळे जयंती साजरी करण्यावर काही निर्बंध असल्याने मोठ्या प्रमाणात साजरी करता आली नाही पण या वेळी आमदार साहेबांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने जयंती साजरी करण्याचे ठरविले असून आम्ही सर्व तन मन धनाने काम करू अशी ग्वाही दिली.पहिल्यांदा शिवजयंती च्या मीटिंग ला एक आमदार उपस्थितीत रहिले पहिल्यांदाच मीटिंग साठी महिला वर्गास आमंत्रण व मोठ्या संख्येने उपस्थिती बैठकीचे निमंत्रक मावळते अध्यक्ष कय्याम सैयद होते,या प्रसंगी आर पी आय चे राजाभाऊ अहिरे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख सुनीलभाऊ हांडगे,युवासेना शहरप्रमुख योगेशभाऊ इमले, काँग्रेसचे संतोषभाऊ अहिरे,आमीन पटेल, बुडन बाबा,राष्ट्रवादीचे अमजद पठाण,आरपीआयचे प्रमोद अहिरे,गुरु निकाळे, वैद्यकीय मदत कक्षाचे पिंटू वाघ,महावीर ललवानी,आप्पा आंधळे, मुकुंद झाल्टे, अज्जूभाई शेख, सुभाष माळवतकर,लोकेश साबळे,महेश बोराडे,दादा घुगे, लाला नागरे,बापू शिंत्रे, दिनेश घुगे, संदीप बागुल, सुनील ताठे पंकज भवर शुभम दराडे दिलीप सोनवणे राजेंद्र कोल्हे धनंजय आंधळे फिरोज पठाण मिलिंद पाथरकर शब्बीर शेख जुबेर शेख अमोल लांडगे अरविंद जाधव तय्यब हेमंत शेख कृष्णा जगताप प्रमोद राणा महेश वाडेकर मोहसीन पठाण विलास परदेशी आकाश खैरे शिवलिंग हिरणवाला अश्पाक शेख, ज्ञानेश्वर उगलमुगले,अनिल पगार, हेमंत माळवतकर, अमोल दंडगव्हाळ,कृष्णा सोनवणे, गणेश सोमासे, जीवन जगताप, मच्छिंद्र सांगळे, सचिन छाजेड, सोनू सोनावाला , सचिन छाजेड, कृष्णा नेरकर संजय दराडे, करण बहोत, बबलू कच्ची, सोहम नागापुरे, आसिफ शेख, वाहीट शेख, भैय्या शेख ,इम्तियाज शेख,आनंद दरगुडे,कुणाल विसापूरकर,निलेश व्यवहारे , महिला आघाडीच्या कल्पना दोन दे सुरेखा डाके वंदना जगताप प्रतिभा अहिरे नीतू परदेसी उषा शिंदे नीता लोंढे वंदना शिंदे अलका कुमावत छाया कोकाटे संगीता सांगळे संगीता घोडेराव चैताली सोनवणे यशोदा खलसे आदि उपस्थितीत होते.सूत्रसंचालन जाफर मिर्झा व बापू वाघ यांनी केले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here