
नाशिक : दिनांक 26 जानेवारी रोजी सम्राट अशोका वेल्फेअर फाउंडेशन संचलित मानव सेवा वृध्दाश्रम येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मनोधार सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष व धम्मगिरी योगा महाविद्यालयाच्या समनवयक श्रीमती गीताताई गायकवाड यांचे *”संविधान आमची ओळख**” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होती यावेळी त्यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व विशद करतांना प्रत्येक भारतीय नागरिकाने संविधान मूल्ये अंगिकारण्याची गरज असल्याचे सांगितले यावेळी त्यांनी वृद्धांना सेवा देणाऱ्या कर्मचारी वर्गाशी संवाद साधला तसेच संचालिका ललिता नवसागर यांच्या कार्याचे कौतुक केले. समाजात अश्या सामाजिक भान असणाऱ्या व्यक्तिमत्वाची नोंद घेऊन त्यांना समाजाने सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले.डॉक्टर सुधाकर शिल्पी अवस्थी यावेळी उपस्थित होते.
