जळगाव तालुक्यात येणाऱ्या नागरिकांना कॉरन्टाईन करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

0
जळगाव– कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन लागू केलेला आहे. लॉकडाऊनमुळे जळगाव तालुक्यातील जे नागरिक जिल्ह्याबाहेर व अन्य राज्यात अडकून असतील त्यांना आपल्या इच्छितस्थळी जाणेकामी शासनाकडून प्राधिकृत यंत्रणेकडून परवानगी देण्यात आलेली आहे. अशा परवानगी प्राप्त नागरिक पर जिल्ह्यांतून व परराज्यातून जळगाव तालुक्यात येणार आहे. अशा नागरिकांना तालुक्यात प्रवेश दिल्याबरोबर त्यांचा, त्यांच्या कुटुंबियांशी किंवा अन्य नागरिकांशी संपर्क येण्यापूर्वीच त्यांना कॉरन्टाईन ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार अशा नागरिकांना कॉरन्टाईन करण्यासाठी जळगाव महानगरपालिकाक्षेत्र व संपूर्ण तालुकाक्षेत्रासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे.

जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रासाठी संतोष वाहुळे, उपायुक्त, महानगरपालिका, जळगाव भ्रमणध्वनी क्रमांक-9922334478, विकास पाटील, आरोग्य अधिकारी, महानगरपालिका, जळगाव भ्रमणध्वनी क्रमांक-9403686210 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here