वडाळा ते हट्टी या पाच किलोमीटर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय

0

सिल्लोड ( प्रतिनिधी  विनोद हिंगमीरे) सिल्लोड तालुक्यातील वडाळा ते हट्टी या पाच किलोमीटर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे या रस्त्यावरून हट्टी बहुली चिंचपुर मांडणा या गावातील नागरिकांची नेहमी वर्दळ असते तसेच कन्नड हुन भराडी वडाळा उंडणगाव गोळेगाव मार्गे अजिंठा लेणीला जाण्यासाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो मात्र या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत तर रस्त्यावर काही ठिकाणी टाकलेले पाईप फुटल्याने गाडी केव्हा खड्ड्यात जाऊन कोसळेल याचा अंदाज सांगता येत नाही विशेष म्हणजे सध्या शेतकऱ्यांचे मिरची तोडण्याचे काम या परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असून मिरचीची वाहतूक करणाऱ्या गाड्या या रस्त्यावरून नेहमीच्या ये-जा करत असतात मात्र या रस्त्यावर मोठमोठे खड्डे व पाणी साचल्याने शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. मात्र स्थानिक प्रशासन हे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचं वडाळा येथील नागरिकांनी सांगितले आहे.

वडाळा ते हट्टी या पाच किलोमीटर रस्त्याची अवस्था ही अत्यंत दयनीय झाली आहे. आमचे स्थानिक आमदार व खासदार हे पाच वर्षांनी येऊन उद्घाटन ही करून जातात मात्र परत पाच वर्षांमध्ये फिरकून सुध्दा पाहत नाही तर संबंधित विभागाने या रस्त्याच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

गंजीधर नामदेव मानकर
( ग्रामपंचायत सदस्य वडाळा )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here