चित्रकला विषयी मुळातच आवड

0

नांदगाव -चित्रकला विषयी मुळातच आवड असलेल्यांनी व नव्याने कलेची आवड निर्माण झालेल्या विद्यार्थी वर्गातील मुलांनी कलाक्षेत्रात आपले करीयर घडवून यशस्वी वाटचाल करीत आहेत. कलेविषयी चे अनेक अभ्यासक्रम शासन निरंतर राबवित आहेत. महाराष्ट्र राज्यातील जवळपास सर्वच जिल्हास्तरावर उत्तम अशी महाविद्यालये आहेत. त्यातून दरवर्षी उत्तम असे कलावंत घडविले जात आहेत. काही कलावंतांनीतर यशाची शिखरे पार कलेली आहेत.व काही करीत आहेत. आज कलेच्या शिक्षण संस्था,महाविद्यालये जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुका स्तरावर सुद्धा आपणास शासनाने उपलब्ध करून दिली आहेत. याच पैकी एक एस.एम.ललित चित्रकला महाविद्यालय नांदगाव. असुन शासनाने सन.१९९६/९७ मध्ये परवानगी दिली आहे.तेव्हापासून ते आजपर्यंत महाविद्यालयाने अनेक कलावंतांना घडविले आहे.तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शक्य त्या सवलती देऊन त्यांना यशाच्या शिखरावर नेण्यात महाविद्यालयाचा खरीचा वाटा आहे .तालुक्यातील बर्याच माध्यमिक विद्यालयात महाविद्यालयात शिक्षण घेतलेली मुले कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. काही विद्यार्थी फोटो ग्राफी ,स्क्रीन प्रिंटिंग, डिजीटल बँनर प्रिंटिंग, पेंटिंग, मुर्तीकार, डिझायनर ई.व्यवसायात यशस्वी वाटचाल करीत आहेत. कलेची सर्व च अभ्यासक्रम व्यवसायीक असल्याने विद्यार्थ्यांना आपल्या जिवणात याची खुपच मदत झालेली दिसुन येते. महाविद्यालयाने याही वर्षी नवीन विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. पण राज्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भाव लक्षात घेता प्रवेश प्रक्रिया आँनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने आपली वेबसाईट सुरु केलेली आहे. ईच्छुक विद्यार्थी मित्रांनी याचा वापर करून आपला प्रवेश अर्ज भरुन प्रवेश निश्चित करावा. *उपलब्ध अभ्यासक्रम* १) फाउंडेशन: १ वर्ष पात्रता:१०वी पास २)ए.टी.डी.: २ वर्ष पात्रता: १२ वी पास ३) जी.डी आर्ट: ए.टी.डी./फाउंडेशन पास †****†वरील अभ्यासक्रम प्रवेशासाठी या लिकंचा वपर करावा.†** अधिक माहिती साठी संपर्क साधावा. श्री. मोरे सर.मो.९४२३४८४०४३/८२०८४४७३७१ श्री. गणेश उंबरेसर ९१७५०७२६६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here