जनजागृती सेवा समितीच्यावतीने महिला रिक्षा चालकांचा सत्कार

0

मुंबई – बदलापुर- महिला या सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत.पायलट,रेल्वे, टॅक्सी, रिक्षा अशा व्यवसायातही महिला कार्यरत आहेत. त्याच अनुषंगाने ८मार्च रोजी संपन्न झालेल्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नुकताच अंजलीनगर, हेंद्रेपाडा, बदलापुर (पश्चिम)येथे जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र या सामाजिक संस्थेच्यावतीने बदलापुर येथील महिला रिक्षा चालकांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणुन डाॅ.निता पाटील फाऊंडेशनच्या अध्यक्षा डाॅ.सौ.निता पाटील,स्वराज्य रणरागिणी महिला मंडळाच्या संचालक अध्यक्षा सौ.सुप्रिया आचरेकर, स्वामी विवेकानंद केंद्र,बदलापुर नगर प्रमुख सौ.मिना देशपांडे या उपस्थित होत्या. या सर्वांचे सौ.गंधाली तिरपणकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महिला रिक्षा चालकांचा सन्मानपत्र, प्रातिनिधिक स्वरूपात २५१/-रु.मानधन व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित महिला रिक्षा चालकांनी आपले अनुभव सांगितले.प्रमुख पाहुण्यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली. संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी प्रास्ताविक केले.तसेच या कार्यक्रमाला डाॅ.सौ.निता पाटील,सौ.सुप्रिया आचरेकर, सौ.मिना देशपांडे या महिला प्रमुख पाहुण्या म्हणुन उपस्थित राहिल्याबद्दल त्यांना आभार पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन जनजागृती सेवा समितीचे खचिनदार दत्ता कडुलकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप जोशी,श्रुती उरणकर, संचिता भंडारी, दत्ता कडुलकर, विराज जाळगावकर,महेश्वर तेटांबे, अॅड.प्रदीप बावसकर यांचे विशेष सहकार्य लाभले. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here