नागरिकांनी नियमाचे पालन करावे-न.पा. डॉ.श्रीय देवचके

0

नांदगाव ( प्रतिनिधी- निखील मोरे ) कोरोनाने नांदगाव शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.नांदगाव शहर कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत असतांनाच नांदगाव शहरात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शहरात एकूूण कोरोना बाधित सहा तालुक्यााातील न्यायडोंंगरी व तादुळवाडी दोन एकूण आठ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.शहरातील एक महिलेचा काल मृत्यू झाला आहे. प्रशासनासह नांदगावकरांची चिंंतेची बाब ठरत आहे.शहरातील रुग्ण राहत असलेला परिसर सील करण्यात आला असून रुग्णाच्या निवासस्थान पासून शंभर मीटर पर्येंत भाग हा कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून शंभर मीटर भाग हा बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. कुटुंबातील व्यक्तीसह रुग्णांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना होमकोरण टाईन करण्यात आले आहे. रूग्ण राहात असलेला परिसरातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.या परिसरात निर्जंतुक करण्यात येत आहे.नांदगाव शहरात खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली असून नांदगाव शहरात कोरोना बाधित रुग्णांचा आठ असून यामध्ये एका महिलेचा अहवाल नंतर मृत्यू झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक ससाणे व वेवैद्यकीय अधिक्षक रोहन बोरसे यांनी सांगितले.बाजारपेठेतील व्यापारी व नांदगावकरांनी याचे भान विसरून शहरात मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी गर्दी केली आहे.गर्दी रोखण्यासाठी नगरपरिषद ,प्रशासन व पोलीस हतबल झाल्याचे दिसून आले आहे.नांदगाव शहरात कोरोना बाधितांचा आकडा आठ असून पुढे वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.शहरातील बाजारपेठत नागरिकांनी सामाजिक अंतर व इतर नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी आहे .तालुका प्रशासन, नगरपरिषद, पोलीसांनी नियम अधिक कठोर करण्याची गरज असल्याचे बोलले जाते.नांदगाव शहरात संपूर्ण नागरिकांची चोवीस शिक्षकांमार्फत कोव्हीड तपासणी करण्यात येणार असून शहरातील बाजारपेठेतील दुकाने नगरपरिषदेने दिलेल्या वेळेत बंद होत नाही. नागरिकांना याचे गांभीर्य नाही.कोरोनाच्या वाढत्या  पार्श्वभूमीवर प्रांतधिकरी व तहसीलदार यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल. मुख्याधिकारी नांदगाव न.पा. डॉ.श्रीय देवचके यांनी सांगितले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here