
अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर) जिल्हाचे विद्यमान खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वडुले खुर्द येथील कानिफनाथ मंदिरासमोरील सभामंडपाचे भुमीपुजन तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री, वंचित बहुजन आघाडीचे राज्यातील नेते किसनराव चव्हाण सर,व पाथर्डीचे माजी नगराध्यक्ष अभयकाका आव्हाड यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.वेदशास्त्र संपन्न विष्णूपंत भालेराव यांच्या मंत्रोच्चारात हा भुमीपुजन सोहळा संपन्न झाला. निस्वार्थ ग्रुप आणि अभयकाका आव्हाड मित्रमंडळ आणि ग्रामस्थ भाविक यांच्या उपस्थितीत हा भुमीपुजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.प्रथम गावाच्या सिमेवर आव्हाड परिवारातील सुवासिनींनी आदिनाथ शास्त्री महाराजांचे औक्षण केले. सीमेवरून गावातील मंदिरा पर्यंत टाळ पखवाजाच्या गजरात वाजत गाजत सवाद्य दिंडी मिरवणूक काढण्यात आली होती.तोफांची सलामी आणि वाजंत्री यांच्या आवाजाने सारी वडुले नगरी दुमदुमून गेली होती. भुमिपुजना नंतर संत वामनभाउ पुंण्यतीथी निमित्ताने शास्त्री यांनी गावात किर्तन सेवा केली. आणि संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर सवाष्ण महिलांच्या ओटी भरण्याचा कार्यक्रमही संपन्न झाला.तसेच गोपी महादेव आव्हाड या विद्यार्थ्यांने राहुरी विद्यापिठातील कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवल्या बद्दल व बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या कोल्हापूरच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतसाठी निवड झाली म्हणून आणि मेजर सुरेश महादेव आव्हाड यांची पोलीस खात्यात निवड झाली म्हणून दोघांचाही महराजांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सभामंडपाच्या बांधकाम मंजुरीसाठी आदिनाथ आव्हाड,शरद आव्हाड, मल्हारी आव्हाड, संदीप आव्हाड, शेषराव आव्हाड, विकास आव्हाड, रमेश आव्हाड, दिलीप आव्हाड,महादेव तुतारे,कुमार रणमले,निव्रत्त कर्नल डॉ. सर्जेराव नागरे,राहुल आव्हाड, यांनी विषेश परिश्रम घेतले.
(प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर)
