
तिरुवनंतपुरम : माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली, भारताने G20 चे अध्यक्षपद स्वीकारले असून G20 इंडिया प्रेसिडेंसी अंतर्गत पहिली हेल्थ वर्किंग ग्रुपची बैठक 18 ते 20 जानेवारी 2023 दरम्यान तिरुवनंतपुरम, केरळ येथे होणार आहे.यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे पारंपरिक पद्धतीने तिरुवनंतपुरम येथे स्वागत करण्यात आले.
