दिवा हायस्कूलचे स्नेह संमेलन मोठया उत्साहात.

0

दिवा(  प्रतिनिधी – महेश्वर तेटांबे ) नुकतेच दिवा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय दिवा चे वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मार्गदर्शक समुपदेशक श्री कमलाकांत अंकुश सर आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थित दिव्यातील आकांक्षा हॉल, दिवा येथे मोठया उत्साहात पार पडला. या कार्यक्रमांची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून आणि पाचवी च्या विध्यार्थ्यांच्या “माझा बाप्पा किती गोड दिसतो..” या गणेश वंदनाने झाली. शाळेने मराठी संस्कृती, परंपरा जपत गण, गवळण, मंगळागौरचे पारंपरिक आणि आधुनिक खेळ दाखवत, “चंद्रमुखी” चित्रपटातील भन्नाट चंद्रा च्या लावणीवर शिट्या, टाळयाचा गजरात चंद्रा.. चा सूर लावत मुलां-मुलींनी गाण्याचा आनंद लुटला.. “इथे तिथे यहाँ वहाँ हाय आपलीच हवा…या रिमिक्स तर मैत्रीचे नाते सांगणारी “आपली यारी…साऊथ रिमिक्स, कोळी गीत, देशभक्तीगीत, स्वच्छ भारत नृत्यावर अशा विविध गाण्याच्या तालावर मुलांनी ठेका धरला होता. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन सौ अर्चना गुरव मैडम, गीताली सरोदे मैडम, वेशभूषा शुभांगी पोटजाळे मैडम, यांनी केले असून, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ जयश्री माळी मैडम यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री गोवर्धन चांगो भगत, सचिव मा. कृष्णा भगत, खजिनदार मा. विष्णू भगत, मा. डी. बी. पाटील, मा. केशव म्हात्रे, ठा. म. पा. परिवहन समितीचे मा. दिपक ठाकुर, मा. सचिन पाटील, मा. अभिनेते दिग्दर्शक राम माळी, सभासद मा. पद्माकर भगत, मा. मधुकर भगत, सौ. संगीता भगत, सौ सपना भगत, शाळेचे मुख्याध्यापक मा. एस ए महाजन, सर्व शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी व अनेक विध्यार्थीनी व विद्यार्थ्यांच्या उपस्थित हा धमाल स्नेह संमेलनाचा सोहळा पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here