
आंध्र प्रदेश : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे लोकसभा प्रवास कार्यक्रमा अंतर्गत तिरुपती, आंध्र प्रदेश येथे आगमन झाल्यावर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. या लोकसभा प्रवासात भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून संसदीय कामकाजाचा व सध्या सुरू असलेल्या विविध केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांचा आढावा घेण्यात येणार आहे.
