
मनमाड : आमदार सुहास अण्णा कांदे संपर्क कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, संघटन व पराक्रम अशा राजस आणि सत्त्व गुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ तसेच भारतीय संस्कृती व हिंदू धर्माचे अभ्यासक तरुणांचे प्रेरणास्त्रोत, स्वामी विवेकानंद यांची जयंती आमदार सुहास आण्णा कांदे व सौ.अंजुम ताई कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्क कार्यालय मनमाड येथे साजरी करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित शिवसेना,युवसेना,महिला आघाडीच्या पदाधिकार्यांनी जिजाऊ मासाहेब तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पार अर्पण करत अभिवादन केले.कुमारी पायल पवार यांनी या वेळी मा जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या यांच्या प्रेरणादाई जीवनाबद्दल मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी शिवसेना जिल्हा उपप्रमुख सुनीलभाऊ हांडगे, राजाभाऊ भाबड, शहरप्रमुख मयूरभाऊ बोरसे, युवासेना शहरप्रमुख आसिफभाई शेख, विठ्ठल नलावडे,आप्पा आंधळे, मुकुंद झाल्टे,लोकेश साबळे,महेश बोराडे,दादा घुगे,सनी बागुल, संजय दराडे,आनंद दरगुडे,कुणाल विसापूरकर,निलेश व्यवहारे उपजिल्हाप्रमुख कल्पना दोंदे, तालुकाप्रमुख विद्या जगताप, संगीता बागुल, मनमाड शहरप्रमुख संगीता बागुल,विधानसभा संघटक पूजा सिद्धार्थ छाजेड,उपतालुका नाजमा मिर्झा,सरला घोगले, शहर समन्वयक लक्ष्मी आहीरे शहर संघटक प्रतिभा आहीरे , संगीता सांगळे,नीता लोंढे, नीता परदेशी,संगीता घोड़ेराव,शीतल जाधव, अंजना सिंह, आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.
