ब्युटी क्वीन स्पर्धेत मुलुंडची जसकीरत कौर विर्क ही उपविजेती (प्रथम)

0

मुंबई – आय आय टी बॉम्बे (पवई- प्रतिनिधी महेश्वर तेटांबे) मुंबई- आयआयटी बॉम्बे आयोजित आशियातील सर्वात मोठ्या ‘मूड इंडिगो’ महोत्सवात दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ब्युटी क्वीन स्पर्धेत देशभरातील जवळजवळ दोनशे तरुणींनी सहभाग घेतला होता. मुलुंडच्या जसकिरत कौर विर्क हिला आयआयटी बॉम्बे येथील कोन्वोकेशनल सभागृहात झालेल्या अंतिम फेरीत ज्युरींनी ब्युटी पेजंट स्पर्धेत उपविजेते (प्रथम) घोषित केले. चित्रपट अभिनेते करण सिंग छाबरा आणि विनोद नायक (फॅशन कपड्यांमधील सुप्रसिद्ध नावे) यांनी जसकीरत कौर यांना पुरस्कार प्रदान केला. जसकिरत कौर सध्या मिठीबाई कॉलेजमधून औद्योगिक मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. तिला योगा आणि बॅडमिंटनमध्येही खूप रस असून तिने आतापर्यंत जिल्हा पातळीवर 2 ट्रॉफीज जिंकल्या आहेत. तिच्या या उत्तुंग यशाचे श्रेय आई रणजित कौर आणि वडील दिलबग सिंग यांना जाते. जसकिरत च्या कर्तुत्वामुळे मुंबई महाराष्ट्रांत तिचे कौतुक होत आहे़.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here