
अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)
आज हींदू धर्मातील समाजात विशिष्ट अमिषे दाखवून धर्मांतर केले जात आहे.धर्माच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण केली जात आहे.आणि आई वडिलांना विसरून पळून जाऊन लग्न केले जात आहे. याला आळा घालन्याचे काम पत्रकारांनी करावे असे आवाहन अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले. ते पत्रकारांच्या सन्मान सोहळ्या प्रसंगी बोलत होते.विखे पुढे म्हणाले की यासाठी केंद्रात कडक कायदा होणे गरजेचे आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे या होत्या. विविध विकास कामे आणि पत्रकारांशी संवाद साधत खा.विखे यांनी उपस्थित पत्रकारांची मने जिंकून घेतली.तिन चार महिन्यांत गेट टुगेदर करीत भाजपाच्या माध्यमातून विविध विकास कामासाठी विशेष प्रयत्न केले जातील असे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी सांगितले.यावेळी संजय बडे,महादेव कुटे,काशिनाथ पाटील लवांडे, संभाजी वाघ,अभय आव्हाड,अर्जुन शिरसाठ यांच्या सह संपूर्ण पाथर्डी तालुक्यातील पत्रकार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्या अगोदर आमदार राजळे यांच्या व्हाईट हाउस येथे आमदार खासदार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पाथर्डी तालुक्यातील गट आणि गणातील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली होती.पत्रकार सन्मान सोहळा बाबुजी आव्हाड महाविद्यालयात संपन्न झाला.विखे यंत्रणेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर)
