
अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वडुले खुर्द येथे वै.भगवान बाबा, वै.वामनभाउ,वै. नारायण महाराज,जळोजी मळोजी महाराज यांच्या पुंण्यतीथी निमित्ताने आणि तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांच्या प्रेरणेने दि.७ते१५जानेवारी या काळात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.भजन,काकडा,विष्णूसहस्त्रनाम,ग्रंथवाचन हरिपाठ, जागर इ.कार्यक्रम होणार आहेत, या काळात सर्व ह.भ.प.चंद्रकांत म. पालवे, गणेश रणमले,सुर्यभान म. केसभट,रवींद्र म. आव्हाड, भालसिंग महाराज, अक्षय म. नागवडकर, सुनिताताई महाराज यांची प्रवचणे तर,सर्व ह.भ.प. चंद्रशेखर म.वारे,उद्धव म. सबलस,अशोक म. कोंगे,निव्रत्ती म.मतकर, सुदर्शन महाराज, लक्ष्मण महाराज कराड,रामकृष्ण महाराज शास्त्री, रामनाथ म. शास्त्री यांची किर्तने होणार आहेत. दि.१४ जानेवारी रोजी दु.३वाजता दिंडी प्रदक्षिणा होणार आहे. रविवार दि.१५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांचे काल्याचे किर्तन होउन महाप्रसादाने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात या सोहळ्याची सांगता होणार आहे.तरी पंचक्रोशीतील भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन समस्त ग्रामस्थ आणि भजनी मंडळ वडुले खुर्द यांच्या वतीने करण्यात आले आहे.
