महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी मनमाड महाविद्यालयाच्या खेळाडूंची निवड

0

मनमाड : पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिम्पिक वजन उचलणे स्पर्धेसाठी महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील खेळाडू कु.दिया व्यवहारे, कु.नूतन दराडे, कु.वैष्णवी इप्पर तीन खेळाडूंची निवड नाशिक जिल्हा संघात झाली असून सदर स्पर्धा दि.१०जानेवारी ते १३ जानेवारी २०२३ दरम्यान पुणे येथील बालेवाडी स्टेडियम येथे होणार आहेत
सादर खेळाडूंचे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी माजी मंत्री समाजश्री डॉ.प्रशांत दादा हिरे समन्वयक डॉ.अपूर्वभाऊ हिरे युवा नेते अद्वयआबा हिरे विश्वस्त मा. संपदादीदी हिरे उपाध्यक्ष डॉ.हरीश आडके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील उप-प्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा.रोहित शिंदे कुलसचिव श्री.समाधान केदारे सर्व प्राध्यापक वृंद प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या सदर खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा.संतोष जाधव प्रा.महेंद्र वानखेडे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री.प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here