
नाशिक : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ,महाराष्ट्र राज्य व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ,बार्टी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मा. आयुक्त, समाज कल्याण विभाग डॉ.प्रशांत नारनवरे तसेच बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात मंडणगड पॅटर्न राबविला जात आहे .त्या अंतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक यांच्या वतीने महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय, येवला येथे जात प्रमाणपत्र पडताळणी बाबत मार्गदर्शन व अर्ज स्वीकृती शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी विचारमंचावर श्रीमती गीतांजली बाविस्कर ,अप्पर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नाशिक प्रमुख अतिथी म्हणून व मार्गदर्शक म्हणून माधव वाघ ,उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती उपस्थित होते., यावेळी प्राचार्य दादासाहेब मामुडे , श्रीमती अनुप्रिता डेंगळे, कपिल जगताप, रुपेश सावंत, पोपट अहिरे,जात पडताळणी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी विचारमंच्यावरून बोलतांना अप्पर जिल्हाधिकारी गीतांजली बाविस्कर म्हणाल्या “शासनाच्या मंडणगड पॅटर्न उपक्रमाचा लाभ विदयार्थ्यांनी घ्यावा. आवश्यक कागदपत्राची पूर्तता करावी. समिती कार्यालयातून आपणास संपूर्ण सहकार्य केले जाईल.”तसेंच त्यांनी उपस्थित विदयार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शन केले. उपायुक्त माधव वाघ यांनी मंडणगड पॅटर्न, शासनाचे धोरण, महाविद्यालयाचे नोडेल अधिकारी यांची भूमिका, महाविदयालयाची भूमिका, कागदपत्रे पूर्तता निकष, यावर मार्गदर्शन केले. यावेळी विदयार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र विषयी माहिती पत्रके मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. त्यानंतर येवला व नांदगाव तालुक्यातील महाविद्यालय नोडेल ऑफिसर यांच्या मार्फत 12 वी विज्ञान वर्गात शिकणारे विद्यार्थी यांचे प्रस्ताव स्वीकृत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा.चंद्रशेखर जोशी यांनी केले. आभार बार्टीचे येवला तालुका समतादूत चंद्रकांत इंगळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनता महाविद्यालय प्राध्यापक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.यावेळी विज्ञान शाखा प्रवेशित विद्यार्थी उपस्थित होते.
