राहुरीच्या अहिल्याबाई होळकर सामाजिक प्रतिष्ठानमध्ये पत्रकार सन्मान सोहळा साजरा

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)
संपूर्ण देशात अतिशय उल्लेखनीय सामाजिक कार्य करुन समाजात आदर्श ठरणाऱ्या आणि अहिल्यादेवीचे नाव सार्थ करणाऱ्या राहुरीच्या पुंण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानने राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पत्रकारांचा सन्मान सोहळा नुकताच साजरा केला.प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय तमनर यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना आमंत्रित केले होते.त्यामध्ये प्रामुख्याने अशोक मंडलिक, सुनिल नजन,रमेश खेमनर,प्रमोद डफळ,वजीर शेख,नजीर शेख,विलास कुलकर्णी,हेमंत मिसाळ,मनोज साळवे,संजय कुलकर्णी,रफिक शेख,राजेंद्र वाडेकर, प्रसाद मैड,गोविंद फुनगे,विलास गीरे,राजेंद्र म्हसे,बंडू म्हसे,सचिन पवार, क्रुष्णा गायकवाड, रियाज देशमुख, आकाश येवले,राजेंद्र पवार, अनिल कोळसे,सागर दोंदे,शरद पाचरणे,संतोष जाधव,राजेंद्र उंडे,टीके फोटोग्राफर,अर्जुन बाचकर,भारत मतकर, श्रीकांत बाचकर,ज्ञानेश्वर बाचकर, बाळकिसन भोसले यांचा समावेश होता. आपल्या जिल्ह्याला अहिल्यादेवीचे नाव देण्यासाठी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात लढा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाभर अहिल्यादेवी नामांतर रथयात्रा धडकनार आहे तरी जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी या नामांतर रथयात्रेस विषेश सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा नामांतर समन्वय समीतीचे प्रमुख विजय तमनर यांनी केले आहे. (प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here