कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये -जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

0

जळगाव- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील नागरीकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत अनावश्यक प्रवास टाळावा. विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन कोरोनास हरविण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी केले.

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्पयाची माहिती देण्यासाठी येथभ्ल नियोजन भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ ढाकणे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी वार्तालाप करताना बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त सतिश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देतांना पुढे सांगितले की, सर्व प्रकारच्या ग्राहकउपयोगी दुकाने सुरु ठेवण्याची अनुमती देत असतानाच त्यांना काही अटी व शर्ती घालून दिलेल्या आहेत. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करणे, ग्राहक आणि दुकानदार यांनी मास्क वापरणे, दुकानाच्या बाहेर ग्राहकांसाठी सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे, दिलेल्या वेळेतच दुकाने सुरू ठेवणे अशाप्रकारे नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास दिलेल्या सवलती पुढेही सुरू ठेवता येतील. लग्नसमारंभास 50 लोकांची उपस्थिती तर अंत्ययात्रेस 20 लोक उपस्थित राहू शकतील याप्रमाणे परवानगी असेल मात्र तेथेही सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपण पालन अपेक्षित आहे.

सर्व प्रकारची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देत असताना सार्वजनिक वाहतूक, धार्मिक कार्यक्रम, शाळा, महाविद्यालये, मॉल्स, स्पा, सलुन दुकाने, ब्युटीपार्लर, हॉटेल्स, रेस्टॉरंट, परमीट रुम, बार 17 मे पर्यंत बंद राहतील. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 52 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यातील 2 बरे होवून त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 13 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला असून 3 रुग्णांचा दवाखान्यात दाखल करण्यापुर्वीच मृत्यू झालेला होता. तर आणखी 3 रुग्ण अत्यावस्थस्थितीतच दाखल झाल्याने त्यांचा 1 ते 4 दिवसांच्या आत मृत्यू झालेला आहे. त्यांना या आजारासोबतच इतरही जूने आजार असल्याचे निष्पण झाले आहे. लवकरच जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग तपासणी प्रयोगशाळा सुरु होणार असल्याचेही यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले.

येथील कोविड रुग्णालयात सर्व रुग्णांची व्यवस्थित काळजी घेतली जात असून पीपीई किट, मास्क, सॅनिटायझरचा अजिबात तुटवडा नाही. त्याचबरोबर जिल्ह्यात औषधे व उपकरणांचा कमतरता नाही. जिल्ह्यात सुरक्षा तसेच दक्षतेच्या कारणास्तव एकूण 16 कटन्मेंट झोन तयार केले आहेत त्यामधील नागरिकांना बाहेर जाता किंवा बाहेरून त्यामध्ये कोणासही प्रवेश करता येणार नाही. या झोनमधील 60 वर्षावरील नागरीकांची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहे. जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर स्थापन करण्यात आले आहे. त्याचबरोबर वैद्यकीय कारण वगळता मुंबई/पुण्यातून कोणालाही जिल्ह्यात येण्यासाठी तसेच जाण्यासाठी परवानगी नाही. त्याचबरोबर जिल्ह्याच्या सिमा 17 मे पर्यंत बंदच राहणार असून मजूर, विद्यार्थी यांना जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी त्यांची पुर्णपणे वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यात कोरोनाचे कुठल्याही प्रकारचे लक्षणे नाही याची खात्री पटल्यावरच त्यांना त्यांच्या जिल्ह्यात जाण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने पास निर्गमित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अनावश्यक प्रवास टाळावा. विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी मास्क न वापरणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारला जात आहे. याबाबत कोणालाही सुट दिली गेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वस्त धान्य दुकानांच्या वाटप प्रकियेत शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत, त्यांना सर्वांनी सहकार्य करून धान्य वाटप अधिक पारदर्शक होण्यासाठी मदत करावी.

जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी कोरोनापासून स्वत:चा व आपल्या परिवाराचा, परिसरातील सर्व नागरिकांचा कसा बचाव करू शकाल याची विस्तृतपणे माहिती स्पष्ट केली. जनता कर्फ्युमध्ये पोलीस आपली जबाबदारी चोखपणे बजावत आहेत. तपासणी नाक्यांवर कडक बंदोबस्त आहे. अनधिकृतपणे जिल्ह्यांच्या सिमा ओलांडण्याच्या प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पोलिसांसोबत ग्राम रक्षक दल, ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली असून ते आपले काम चोखपणे बजावत आहे तेव्हा जनतेनेही त्यांना सहकार्य करून कोरोना विषाणू घालवण्यासाठी मीच रक्षक बनावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

महानगरपालिकेचे आयुक्त सतिश कुलकर्णी यांनी प्रसारमाध्यमांना संबोधतांना सांगितले की, 28 मार्च व 1 एप्रिल या दोन दिवसात जिल्ह्यात दोनच कोरोनाचे रुग्ण होते त्यातील एकाचा मृत्यू तर एक बरा होवून त्याला घरी पाठविण्यात आल्यानंतर जिल्हा कोरोना मुक्त झाल्याने आपण सुटकेचा निश्वास सोडला होता. परंतु दुर्देवाने हा आनंद फार काळ आपल्याला टिकवता आला नाही आणि कुणाच्यातरी संपर्कात आल्याने आणि कुणाच्यातरी संसर्गामुळे जिल्ह्यतील रुग्णांची संख्या 52 वर पोहचली आहे. कारण हा आजार केवळ संपर्क आणि संसर्गामुळेच बळावतो घरात बसून हा आजार आपल्या जवळ येवूच शकत नाही. कफ्युचे प्रत्येक नागरिकाने काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे. विशेष म्हणजे प्रतिबंधिक क्षेत्रात कटाक्षाने नियम पाळणे आवश्यक आहे.  किरकोळ भाजी विक्रेत्यांनी दोन दुकानांमध्ये किमान 20 फुट अंतर आणि त्यांच्या दुकानासमोर एकावेळेस एकच ग्राहक असेल याची संपूर्ण जबाबदारी भाजी विक्रेत्यावर असेल. यात दिरंगाई आढळल्यास त्या विक्रेत्यास दंड आणि त्याचे दुकानही बंद करण्याच्या सुचना सर्व संबंधित यंत्रणांना दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.           00000

जिल्ह्यात 20 मे पर्यंत 37 (1) (3) कलम लागू

जळगाव-  जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 20 मे, 2020 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) (3) लागू करण्यात आले आहे.

या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित पोलीस स्टेशन यांच्या कार्यालयाची पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश लग्न समारंभाच्या मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी वामन कदम यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

मे महिन्याचा विभागीय लोकशाही दिन रद्द

जळगाव – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या 18 मार्च, 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार शासनाने संपूर्ण राज्यात 17 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केलेला आहे. शिवाय शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांची केवळ 5 टक्केच उपस्थिती असावी, असे शासनाचे आदेश आहेत.

नागरीकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. शासनाच्या आदेशानुसार कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यानुसार माहे मे महिन्याचा विभागीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. असे उपायुक्त, (महसूल) दिलीप स्वामी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

———–

कृषि सेवा केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी

शेतकऱ्यांनी बीयाणे व खतांची मागणी गटाकडे करण्याचे

कृषि विभागाचे आवाहन

जळगाव- जिल्हयात कोरोना (कोविड-19) विषाणुच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी जाहिर करण्यात आलेली आहे. अशा परिस्थीतीत शेतक-यांनी कृषी सेवा केंद्रावर येऊन बियाणे, खते व किटकनाशक खरेदी करतांना जास्त गर्दी होऊ शकते. तसेच सोशल डिस्टसिंग न पाळले गेल्यामुळे कोरोना विषाणुचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो.

कृषि केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी शेतकरी बांधवानी त्यांच्या भागात किंवा सोईच्या गटाकडे आपली नोंदणी करावी. त्यांनी आवश्यक असणारे विविध पिकांचे बियाणे, खते व किटकनाशके यांची मागणी गटाकडे करावी. शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपनी यांचे प्रमुख हे कृषि सेवा केंद्रावर जाऊन एकत्रीत खरेदी करतील. यामुळे कृषि सेवा केंद्रावर खरेदीसाठी गर्दी होणार नाही. या प्रक्रीयेत कृषि विभागाचे अधिकारी/क्षेत्रीय कर्मचारी समन्वयक म्हणून काम पाहतील.

शेतकरी बांधवांनी कृषी निविष्ठा खरेदीसाठी संबधीत कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधून या पध्दतीचा अवलंब करावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकुर यांनी केले आहे.

————-

शेतकऱ्यांनी एचटीबीटी कापूस वाणाची लागवड न करण्याचे

कृषि विभागाचे आवाहन

जळगाव – बीटी कापसाच्या बियाण्यांमध्ये परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील असणारे Transgenic Glyphosate/Herbicide Tolerant trait  वापरुन अनेक बोगस कंपन्या बियाणे उत्पादन करुन विकत आहे.

एचटीबीटी या अवैध कापुस बियाण्यापासुन पर्यावरणास असलेला धोका, जमिनीची सुपीकता नष्ट होण्याचा धोका, नागरीकांच्या अन्न सुरक्षेला असलेला धोका विचारात घेता, खरीप हंगाम 2020 मध्ये सदर बियाणे कोणत्याही परिस्थितीत शेतकरी बांधवांनी या वाणांची लागवड करु नये, तसेच या वाणाचे अवैधरीत्या  व बिना बिलाने खरेदी करु नये.

अशा कापुस वाणांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसुन आल्यास कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 0257/2239054 वर माहिती द्यावी. असे आवाहन संभाजी ठाकुर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

——————-

भारतीय खाद्य निगमकडून इंडियन रेडक्रॉस सोसायटीस

एक मेट्रीक टन तांदूळ सवलतीच्या दरात उपलब्ध

धर्मदाय संस्थांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 4 – कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या मदत आणि सहाय्यतेसाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटी, शाखा जळगाव यांना डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी जळगाव यांचे निर्देशानुसार भारतीय खाद्य निगम यांचेकडून शासनाच्या Open Market Sales Scheme अंतर्गत नुकताच एक मेट्रीक टन तांदूळ सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

कोरोना विषाणु संसर्गामुळे लॉकडाऊन कालावधीत निवारागृह आणि अन्न व्यवस्थेबाबत करावयाच्या तातडीच्या उपाययोजनेनुसार भारतीय खाद्य निगम यांच्य Open Market Sales Scheme (OMSS)        अंतर्गत कम्युनिटी किचन भोजन व्यवस्था करणेसाठी सवलतीच्या दरात भारतीय खाद्य निगमकडून गहू आणि तांदूळ उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासाठी कम्युनिटी किचन अंतर्गत कार्य करणा-या स्वयंसेवी संस्था, धर्मदाय संस्था यांनी जिल्हाधिकारी यांचेकडेस विहित प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. असा प्रस्ताव प्राप्त झाल्यावर सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचे शिफारशीसह भारतीय खाद्य निगमकडे पाठवला जातो. प्रस्ताव खाद्य निगम यांचेकडून मान्य झाल्यावर संबंधित संस्थेने निगमच्या बँक खात्यात आवश्यक खरेदीची रक्कम जमा केल्यावर संबंधित संस्थेच्या नावाने वितरण आदेश  निर्गमित  करण्यात येतात. त्यानुसार अर्जदार संस्था त्यांचे जिल्ह्यातील खाद्य निगमच्या डेपोतून धान्य उचल करते. सद्यस्थितीत अशा संस्थांसाठी गहू 21 हजार रुपये प्रति मे. टन आणि तांदूळ 22 हजार रुपये प्रति मे. टन असे सवलतीचे दर भारतीय खाद्य निगमकडून निश्चित करण्यात आले आहे. सवलतीच्या दरातील गहू आणि तांदूळ कमीत कमी एक मे. टन खरेदी करणे आवश्यक असुन जास्तीत जास्त खरेदीसाठी मर्यादा नाहीत.

भारतीय खाद्य निगमच्या या स्कीममध्ये समावेश होऊन अन्नाधान्य सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देणेबाबत प्रस्ताव इंडियन रेडक्रॉस सोसायटी, शाखा जळगाव यांनी नुकताच जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचेकडे सादर केला होता. जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी संस्थेच्या विनंतीची तात्काळ दखल घेऊन भारतीय खाद्य  निगम, मनमाड यांना सवलतीच्या दराने एक मे. टन तांदूळ उपलब्ध करुन देणेबाबत शिफारस केली होती. भारतीय खाद्य निगम, मनमाड येथील अधिका-यांनी जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या शिफारशीनुसार तात्काळ कार्यवाही करुन संस्थेस आवश्यक रक्कम ऑनलाईन स्वरुपात शासन जमा करणेबाबत सुचित केले होते.  संस्थेने आवश्यक रक्कम खाद्य निगमच्या खात्यात जमा केल्यावर संस्थेस धान्य वितरण आदेश देणेत आले आहेत. इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांना जळगाव येथील MSWC गोदामातून एक मे. टन तांदूळ उपलब्ध करुन देणेत येत आहे.

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मदत आणि सहाय्यतेसाठी ज्या संस्थांना भारतीय खाद्य निगमच्या OMSS अंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्य हवे असल्यास संस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावा. प्रस्तावात संस्थेचे नाव, कार्य, संपर्क क्रमांक, ईमेल आयडी तसेच संस्थेस कोणत्या बाबींसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य हवे, किती हवे आहे. संस्थेस सवलतीच्या दराने मान्यता मिळाल्यास संस्था खाद्य निगमकडे विहित आवश्यक खरेदी मुल्य भरणेस तयार असलेबाबतचा उल्लेख इ. बाबत माहिती संस्थेच्या लेटर पॅडवर सादर करावी.

संस्थेने सादर केलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रस्ताव शिफारशीसह भारतीय खाद्य निगम यांचेकडे साद करणेत येतो. खाद्य निगम यांचेकडून प्रस्तावास मान्यता देणेत आल्यावर संबंधित संस्थेस विहित खरेदी मुल्य ऑनलाईन भरणा करणेबाबत सुचित करणेत येते. भरणा झाल्यावर संस्थेच्या नावाने त्वरीत धान्य वितरण आदेश देणेत येतात. जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, धर्मदाय संस्था यांनी शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

———————

कृषि क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या संस्थांनी

विविध पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत

जळगाव- कृषि क्षेत्रात उल्लेखनिय कामगीरी करणाऱ्या व्यक्ती/संस्था यांना कृषि विभागाकडून विविध पुरस्काराने गौरविले जाते. सन 2020 या वर्षात कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या व्यक्ती/संस्था यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि रत्न, वसंतराव नाईक कृषि भुषण, जिजामाता कृषि भुषण, उद्यान पंडित आणि वसंतराव नाईक शेतीमित्र या पुरस्कारासाठी आपल्या तालुक्याच्या तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क करुन प्रस्ताव तयार करावा व तो पस्ताव तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे सादर करावेत.

अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

————–

खते, बीयाणे व किटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी

जिल्ह्यात सोळा भरारी पथकांची स्थापना

जळगाव- खरीप हंगाम 2020 मध्ये बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके निविष्ठांच्या गुणवता नियंत्रणासाठी भरारी तपासणी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. हे भरारी पथक जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर स्थापन करण्यात आले आहे. या पथकात कृषि विभागाकडील गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक व वैधमापनशास्त्र विभागाकडील निरिक्षकांचा समावेश करण्यात आलेला आहे. जिल्हयातील स्थापना केलेली पथके व त्यांचे दुरध्वनीबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

जिल्हास्तरीय पथकात कृषि विकास अधिकारी, पथक प्रमुख-0257-2237927/9403177529, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक, सदस्य-8275639468, निरिक्षक वजनमापे, जळगाव, सदस्य-0257-2241149, सचिव- 9423 927404, मोहिम अधिकारी-9423158748 यांचा समावेश आहे .

तालुकास्तर जळगाव-तालुका कृषि अधिकारी, जळगाव पथक प्रमुख  0257-2240047/9405735079, कृषि अधिकारी, (गुनि) न.स. जळगाव,  सदस्य-9403832075, मंडळ कृषि अधिकारी (जळगाव-1) सदस्य – 9421735166, मंडळ कृषि अधिकारी ( जळगाव -2) सदस्य-9421735166, निरिक्षक वजनमापे ग्रामीण भाग, सदस्य-9423490149, कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, सचिव-9405672939 यांचा समावेश आहे.

तालुकास्तर भुसावळ- तालुका कृषि अधिकारी, भुसावळ  पथक प्रमुख  02582-222939/9420805506, कृषि अधिकारी, ( गुनि) न.स. भुसावळ , सदस्य- 9423770606, मंडळ कृषि अधिकारी भुसावळ,  सदस्य – 8055250250, मंडळ कृषि अधिकारी,  वरणगाव,  सदस्य -8055250250, निरिक्षक वजनमापे,  सदस्य -9850737303, कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, सचिव- 8459188308 हे आहेत.

तालुकास्तर  बोदवड-तालुका कृषि अधिकारी,   बोदवड,  पथक प्रमुख  02582-275892/ 8275254593, कृषि अधिकारी, (गुनि) न.स. बोदवड,  सदस्य -9423770606, मंडळ कृषि अधिकारी बोदवड – सदस्य – 8975014565, निरिक्षक वजनमापे – सदस्य -9850737303, कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, सचिव- 9767696283 हे आहेत.

तालुकास्तर  यावल  – तालुका कृषि अधिकारी,   यावल,  पथक प्रमुख  02585-261536-7588814849, कृषि अधिकारी, ( गुनि) न.स. यावल – सदस्य – 9421750815, मंडळ कृषि अधिकारी यावल – सदस्य – 9762957405, मंडळ कृषि अधिकारी  फैजपूर – सदस्य – 8379036686, मंडळ कृषि अधिकारी  किनगाव – सदस्य –  9404568528, निरिक्षक वजनमापे – सदस्य –9422562247, कृषि अधिकारी – तालुका कृषि अधिकारी कार्यालय – सचिव – 9762957405,

तालुकास्तर  रावेर  – तालुका कृषि अधिकारी,   रावेर,  पथक प्रमुख  02584-251147-9049034809, कृषि अधिकारी, ( गुनि) प.स. रावेर – सदस्य – 9022816464, मंडळ कृषि अधिकारी सावदा – सदस्य – 8411823111, मंडळ कृषि अधिकारी  पाल – सदस्य – 9409034809, निरिक्षक वजनमापे – सदस्य –9850737303, कृषि अधिकारी – तालुका कृषि अधिकारी कार्यालय – सचिव – 8788399130,

तालुकास्तर   मुक्ताईनगर  – तालुका कृषि अधिकारी,    मुक्ताईनगर,  पथक प्रमुख  02583-234742-9020056950, कृषि अधिकारी, ( गुनि) प.स.  मुक्ताईनगर – सदस्य – 9420214956, मंडळ कृषि अधिकारी  मुक्ताईनगर – सदस्य – 7038379926, मंडळ कृषि अधिकारी  कु-हा – सदस्य – 9975766036, निरिक्षक वजनमापे – सदस्य –9850737303, कृषि अधिकारी – तालुका कृषि अधिकारी कार्यालय – सचिव – 7038379926,

तालुकास्तर   पाचोरा   – तालुका कृषि अधिकारी,    पाचोरा,  पथक प्रमुख  02596-244629-9403778207, कृषि अधिकारी, ( गुनि) प.स.  पाचोरा – सदस्य – 9403806676, मंडळ कृषि अधिकारी पाचोरा – सदस्य – 9422605028, मंडळ कृषि अधिकारी पिंपळगाव – हरेश्वर – सदस्य – 8329516418, मंडळ कृषि अधिकारी नगरदेवळा – सदस्य –9403778207 निरिक्षक वजनमापे – सदस्य –9881747268, कृषि अधिकारी – तालुका कृषि अधिकारी कार्यालय – सचिव – 7820864129,

तालुकास्तर   भडगाव   – तालुका कृषि अधिकारी,    भडगाव,  पथक प्रमुख  02596-223121-94045877807, कृषि अधिकारी, (गुनि) प.स.  भडगाव – सदस्य – 9422232118, मंडळ कृषि अधिकारी  भडगाव – सदस्य – 9405940428, मंडळ कृषि अधिकारी कजगाव –  सदस्य – 7218647412,  निरिक्षक वजनमापे – सदस्य –9881865539, कृषि अधिकारी – तालुका कृषि अधिकारी कार्यालय – सचिव – 9421635048,

तालुकास्तर   चाळीसगाव   – तालुका कृषि अधिकारी,    चाळीसगाव,  पथक प्रमुख  02589-222465-7588927229, कृषि अधिकारी, (गुनि) प.स.  चाळीसगाव – सदस्य – 7588052100, मंडळ कृषि अधिकारी  चाळीसगाव -1 – सदस्य – 8806677243, मंडळ कृषि अधिकारी चाळीसगाव-2 – सदस्य – 8830245068, मंडळ कृषि अधिकारी   मेहरुणबारे – सदस्य –9552626521   मंडळ कृषि अधिकारी   तळेगाव – सदस्य –  8275163480, निरिक्षक वजनमापे – सदस्य –9881865539, कृषि अधिकारी – तालुका कृषि अधिकारी कार्यालय – सचिव – 8830245068,

तालुकास्तर   जामनेर   – तालुका कृषि अधिकारी,    जामनेर,  पथक प्रमुख  02580-230076-9604097549, कृषि अधिकारी, (गुनि) प.स. जामनेर – सदस्य – 7744882121, मंडळ कृषि अधिकारी जामनेर  – सदस्य –9168819694, मंडळ कृषि अधिकारी  पहूर –  सदस्य –9421499643, मंडळ कृषि अधिकारी   फत्तेपूर – सदस्य –9423160974   मंडळ कृषि अधिकारी   नेरी – सदस्य –  9604097549, निरिक्षक वजनमापे – सदस्य –9881747268, कृषि अधिकारी – तालुका कृषि अधिकारी कार्यालय – सचिव – 9423974610,

तालुकास्तर   अंमळनेर   – तालुका कृषि अधिकारी, अंमळनेर,  पथक प्रमुख  02587-222675-9422625574, कृषि अधिकारी, (गुनि) प.स. अंमळनेर – सदस्य – 7588815842, मंडळ कृषि अधिकारी  अंमळनेर  – सदस्य –7741949247, मंडळ कृषि अधिकारी  पातोंडा –  सदस्य –9421690417, मंडळ कृषि अधिकारी   मारवड – सदस्य –9403415675   निरिक्षक वजनमापे – सदस्य –9423490149, कृषि अधिकारी – तालुका कृषि अधिकारी कार्यालय – सचिव – 7588815842,

तालुकास्तर    चोपडा   – तालुका कृषि अधिकारी, चोपडा,  पथक प्रमुख  02586-220216-9657984708, कृषि अधिकारी, (गुनि) प.स. चोपडा – सदस्य – 9423191388, मंडळ कृषि अधिकारी चोपडा  – सदस्य –7588011650, मंडळ कृषि अधिकारी  अडावद –  सदस्य –9421160312, मंडळ कृषि अधिकारी   हातेड – सदस्य –7588614168   निरिक्षक वजनमापे – सदस्य –9422562247, कृषि अधिकारी – तालुका कृषि अधिकारी कार्यालय – सचिव – 7588011650,

तालुकास्तर    पारोळा   – तालुका कृषि अधिकारी, पारोळा,  पथक प्रमुख  02597-222536-7588001233, कृषि अधिकारी, (गुनि) प.स. पारोळा – सदस्य – 7588547929, मंडळ कृषि अधिकारी पारोळा-1  – सदस्य –8975305593, मंडळ कृषि अधिकारी  पारोळा -2 –  सदस्य –9420113801, मंडळ कृषि अधिकारी   तामसवाडी – सदस्य –7743925429   निरिक्षक वजनमापे – सदस्य –9423490149, कृषि अधिकारी – तालुका कृषि अधिकारी कार्यालय – सचिव – 8788172389,

तालुकास्तर    एरंडोल  – तालुका कृषि अधिकारी, एरंडोल  पथक प्रमुख  02588-244168-7588001233, कृषि अधिकारी, (गुनि) प.स. एरंडोल – सदस्य – 7588580140, मंडळ कृषि अधिकारी एरंडोल – सदस्य –9518363368,  मंडळ कृषि अधिकारी  कासोदा – सदस्य –9422982151, निरिक्षक वजनमापे – सदस्य –9423490149, कृषि अधिकारी – तालुका कृषि अधिकारी कार्यालय – सचिव – 9890405347,

तालुकास्तर  धरणगाव  – तालुका कृषि अधिकारी, धरणगाव  पथक प्रमुख  02588-252313-9422235813, कृषि अधिकारी, (गुनि) प.स. धरणगाव – सदस्य – 9850177487, मंडळ कृषि अधिकारी  धरणगाव – सदस्य –9595878783,  निरिक्षक वजनमापे – सदस्य –9423490149, कृषि अधिकारी – तालुका कृषि अधिकारी कार्यालय – सचिव – 9595878783,

या पथकांमार्फत बियाणे, खते व किटकनाशके योग्यदरात विक्री व निविष्ठा सहनियंत्रणाबाबत धडक मोहिम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here