श्रीनगर / सीआरपीएफच्या पेट्रोलिंग पार्टीवर दहशतवादी हल्ला; 3 जवान शहीद आणि 7 जखमी, 1 दहशतवादी ठार

0

हंदवाडा. हंदवाडाच्या काजीबाद परिसरात सोमवारी सीआरपीएफच्या पेट्रोलिंग पार्टीवर दहशतवादी हल्ला झाला आहे. सुरक्षादलाने या हल्ल्याचे प्रत्युतर देताना एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले, पण यादरम्यान 3 जवान शहीद झाले आहेत तर 7 जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर सीआरपीएफने परिसराला सील केले आहे. सध्या सर्वत्र सर्च ऑपरेशन सुरू आहे.

दरम्यान, दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या बाहेरील नौगामच्या वागूरा परिसरात सीआयएसएफच्या पेट्रोलिंग पार्टीवर हल्ला केला. यादरम्यान सीआयएसएफचा एक जवान जखमी झाला आहे. सुरक्षादलाने या परिसराला सील केले आहे.

कमांडिंग ऑफिसरसह 5 जवान शहीद

हंदवाडामध्येच शनिवारी रात्री झालेल्या एनकाउंटरमध्ये 21 राष्ट्रीय रायफल्स (आरआर) चे कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मासह 5 जवान शहीद झाले. या चकमकीत भारतीय सेनेने दोन दहशतवाद्यांना ठार केले. यातील एक लश्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर हैदर होता. दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर उत्तर काश्मीरच्या एका घरात सुरक्षादलाने हल्ला चढवला. दहशतवाद्यांनी या घरातील लोकांना बंधक बनवले होते. त्यांनाच वाचवण्यासाठी जवान गेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here