
चेन्नई : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या पुद्दुचेरी भेटीदरम्यान JIPMER, पुद्दुचेरीची आढावा बैठक घेऊन SSB Annexe इमारत आणि PET-CT सुविधा केंद्राला भेट दिली. यावेळी माननीय खासदार श्री एस. सेल्वागनबाथी, आमदार श्री वी.पी. रामलिंगम हे देखील उपस्थित होते. यावेळी डॉ. भारती पवार यांनी काही रुग्णांशी संवाद साधून त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या तसेच सर्वसामान्यांना अत्याधुनिक व सर्व सुविधांनीयुक्त आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या पद्धतीने देण्यासाठी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
