माजी “पोलीस पाटील”स्व. मळूपाटील उघडे यांचा पंधरावा पुंण्यतीथी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न!

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)
पोलीस पाटील स्व. मळूपाटील उघडे हे संपूर्ण नगर जिल्ह्यात अतिशय सोज्वळ असे व्यक्तीमत्व म्हणून सर्वत्र प्रसिद्ध होते. पोलिस खात्याला चांगले सहकार्य केले म्हणून त्या काळात पाथर्डी पोलीस ठाण्यात त्यांना सन्मानित केले होते.अशा कर्तृत्ववान महापुरुषांचा पंधरावा पुंण्यतीथी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी तालुक्याच्या सिमेवर असलेल्या कोपरेगाव पंचक्रोशीत त्या काळात त्यांच्या नावाचा मोठा दरारा होता. साधारण सन१९७० ते २००५ या काळात त्यांनी अतिशय इमाने इतबारे पोलीस खात्याची “पोलीस पाटील “म्हणून सेवा केली.त्यांच्या कार्याची आठवण आजच्या पिढीला रहावी म्हणून त्यांचे चिरंजीव बबनराव, शिवाजी, भाउसाहेब यांनी आजपर्यंत अखंडपणे पंधरा वर्षे त्यांचा पुंण्यतीथी सोहळा साजरा करून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.स्व.मळूपाटील उघडे यांच्या सुनबाई सौ.छायाताई भाउसाहेब उघडे या आजही कोपरेगावच्या विद्यमान सरपंच आहेत.आज समाजात आई वडील जिवंत असतानाही त्यांना त्यांचीच मुले सांभाळत नाहीत ही एक शोकांतिका आहे. पण म्रुत्यु नंतर ही आजपर्यंत पंधरा वर्षे पुंण्यतीथी सोहळा साजरा करण्याचे औदार्य फक्त उघडे परिवार करीत आहे.या सोहळ्यासाठी व्रुद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक कुशिनाथ बर्डे, माझी संचालक चारुदत्त वाघ,पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजीराव पालवे, माजी खासदार स्व.बाळासाहेब विखे यांचे मीरीगावचे खंदे समर्थक राजूमामा तागड,हनुमान टाकळी सोसायटीचे चेरमन सुभाष बर्डे,माजी चेरमन अशोकराव काजळे, मीरीचे माजी सरपंच संतोषजी शिंदे,जगदीश सोलाट,महादेव कुटे,अण्णासाहेब शिंदे,काँग्रेसचे पाथर्डी तालुका अध्यक्ष प्रकाश शेलार,शेवगाव रासपचे आत्माराम कुंडकर, वाघोली ग्रामपंचायतचे शिल्पकार युवानेते उमेश भालसिंग,वाघोली सोसायटीच्या व्हा.चेरमन सौ.मीराबाई भिमराज शिंदे, वडुलेचे सरपंच बाळासाहेब आव्हाड,दुमाला जवखेडेचे माजी सरपंच सचिन नेहुल,एकनाथ आव्हाड, प्रल्हाद आव्हाड, शिवनाथ आव्हाड गुरुजी, वाघमोडे मंत्री,उपसरपंच नारायण वाघमोडे, राहुल आव्हाड हे उपस्थित होते.शेवगावचे ह.भ.प.महेश महाराज हरवणे यांनी आपल्या खुमासदार शैलीने किर्तन सेवेतून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ह.भ.प.बाबासाहेब महाराज मतकर यांनी साथ संगत केली. ह.भ.प.भाउसाहेब महाराज भालसिंग यांनी आदरांजली अर्पण केली. या वेळी पंचक्रोशीतील अनेक मांन्यवर उपस्थित होते पसायदान आणि महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली. ( प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here