दुमाला जवखेडे ते तिसगाव रस्त्याच्या कामास अतिशय वेगानं सुरुवात

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)
जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील दुमाला जवखेडे ते तिसगाव या सहा किलोमीटर रस्त्याच्या प्रस्तावित आराखडा मोजणी कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून पंचाहत्तर वर्षे उलटली तरीही या रस्त्यावर अजूनही खडीकरण डांबरीकरण झालेले नाही ही शासनाच्या द्रुष्टीने अतिशय लांछनास्पद बाब आहे. परंतु भाजपच्या आमदार मोनिकाताई राजळे,खासदार सुजय विखे,आणि माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्या विषेश प्रयत्नाने जवखेडे ते तिसगाव या रस्त्याच्या कामास मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून मंजुरी मिळाली आहे.डांबरी करणाचा शुभारंभही थोड्याच दिवसात होणार आहे. परंतु आता रस्त्याच्या कामासाठी दुतर्फा रस्ता मोजनी सुरु झाली आहे.कारण दळणवळणाच्या सोयी साठी हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे. शिंदे-फडवणीस सरकारने या कामास तात्काळ मंजुरी दिली आहे. युवा नेते चारुदत्त वाघ आणि जवखेडे दुमालाचे ग्रामपंचायत पदाधिकारी, आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी या कामात प्रत्यक्ष लक्ष घालून कामास सुरुवात व्हावी म्हणून पाठपुरावा करत विषेश प्रयत्न केले आहेत.यामध्ये प्राधान्याने विक्रम नेहुल सर,भास्कर नेहुल,चेरमन कचरु नेहुल,व्हा.चेरमन रमेश नरवडे,संदिप नेहुल, संपत कसोटे,प्रमोद काकडे,वसंत नेहुल, आबासाहेब नेहुल,डॉ बबन नेहुल, अशोक नेहुल,गंगाधर नेहुल, राजेंद्र नेहुल,जगदीश नेहुल, आदिनाथ गीरी,विजय सोनवणे यांच्या नावाचा उल्लेख करता येईल. जवखेडे दुमाला ते तिसगाव या रस्त्याच्या कामास मंजुरी मिळवण्यासाठी भाजपच्या खासदार, आजी माजी आमदार या नेत्यांनी प्रयत्न केले परंतु श्रेय घेण्यासाठी मात्र दुसरेच लोक जिवाचा आटापिटा करत रस्सीखेच करत आहेत ही एक गावात शोकांतिका निर्माण झालीआहे.दोन डगरीवर हात ठेवणारांचे येथे मात्र पितळच उघडे पडले आहे. (प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here