मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुर्वेश सरनाईक यांच्या माध्यमातून ठाण्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या वंडरलँड ठाणे या फेस्टिवलला उपस्थित

0

मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

ठाणे: पुर्वेश सरनाईक यांच्या माध्यमातून ठाण्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या वंडरलँड ठाणे या फेस्टिवलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून जमलेल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. या फेस्टिव्हलमध्ये ४० फुट उंचीचे ख्रिसमस ट्री उभारण्यात आले आहे. बॉलीवूडचे प्रसिद्ध सिने दिग्दर्शक जो रंजन यांच्या हार्वे इंडिया या संस्थेच्या माध्यमातुन हे ख्रिसमस ट्री उभारण्यात आले आहे.या फेस्टिव्हलच्या माध्यमातून प्रसिद्ध रॉक बँड्सच्या आल्हाददायक संगीताचा आस्वाद नागरिकांना घ्यायला मिळणार आहे. ठाणे शहरातील सामान्य नागरिकांना नाताळ सण व नवीन वर्षाचा आनंद घेता यावा या प्रमुख उद्देशाने फेस्टिवलचे आयोजन करणाऱ्या पुर्वेश सरनाईक यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासमयी अभिनंदन करित शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी माजी नगरसेविका परिषा सरनाईक, माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक, माजी नगरसेविका आशा डोंगरे तसेच सिने दिग्दर्शक जो रंजन आणि या फेस्टिव्हलचा आस्वाद घेण्यासाठी आलेले ठाणेकर नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here