
मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
ठाणे: ठाणे शहरातील ‘चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोळी महोत्सवाला उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोळी बांधवांना शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. येत्या काही वर्षात मुंबई शहराचा कायापालट केला जाणार असून त्यात प्रामुख्याने कोळीवाड्यांचा देखील अनोख्या पध्दतीने विकास करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक कोळी बांधवांना रोजगार मिळणार असून त्यांच्या गरजांचा विचार करूनच या भागांचा पुनर्विकासदेखील शक्य होणार असल्याचे यासमयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित करताना स्पष्ट केले.याप्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक व प्रवक्ते नरेश म्हस्के, कोपरी विभागाचे विभागप्रमुख हेमंत पमनानी, माजी नगरसेविका सौ.मालती पाटील, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव सुशांत शेलार तसेच कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.
