
मनमाड : भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांचे दिनांक 25-12-2022 रोजी जन्म दिनानिमित्त सुशासन दिन पाळण्यात येत असून त्यानिमित्ताने नाशिक ग्रामिण पोलीस दलाचे वतीने मा.श्री. शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण व मा.श्री. अनिकेत भारती, अप्पर पोलीस अधीक्षक, मालेगाव यांचे मार्गदर्शनाखाली मा.श्री.समीरसिंह साळवे. उपविभागीय पोलीस अधिकारी, मनमाड विभाग यांनी आज रोजी सिता लक्ष्मी हॉल, छत्रे हायस्कूल, मनमाड येथे तणावमुक्त जीवन या विषयावर श्री संदिप देशपांडे सर यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. या कार्यक्रमासाठी मनमाड उपविभागातील पोलीस निरीक्षक श्री अनिल भवारी, येवला तालुका पोलीस स्टेशन श्री प्रल्हाद गिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनमाड शहर पोलीस स्टेशन, श्री गौतम तायडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वडनेर भैरव पोलीस स्टेशन यांचे सह विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. श्री संदिप देशपांडे सर यांनी तणावमुक्त जीवन कसे जगावे याविषयी मार्गदर्शन करतांना जिवन जगताना प्रत्येक क्षणामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी हास्यास्पद घटना कशा घडतात याबाबत किस्से सांगुन उपस्थितांना मनमुराद हसवले. कार्यक्रमाचे शेवटी श्री प्रल्हाद गिते, सपोनि मनमाड पोलीस स्टेशन यांनी उपस्थितांचे आभार मानले.
