औरंगाबाद- (प्रतिनिधी-प्रसाद कडव)
तेजस फौंडेशन आयोजित राज्य स्तरीय समाज भूषण पुरस्कार २०२२ सोहळा नुकताच औरंगाबाद येथील मैलाना आझाद संशोधन केंद्र सभागृह येथे संपन्न झाला. या सोहळ्यात विविध स्तरावरील कार्य करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी दिघंची शहराचे सुपूत्र तसेच प्रसाद के न्युजचे संपादक प्रसाद कडव याना ज्येष्ठ साहित्यिक व ४० व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा. ऋषिकेश कांबळे सर यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसाद कडव हे गेली २०१७ पासून विविध वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत असून. सोलापूर मधुन त्यांनी विज्ञान शाखेतील रसायनशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून स्थानिक स्तरावर माणदेश एक्सप्रेस या दैनिकात प्रतिनिधी स्वरूपात पत्रकरीता चालू केली. २०१८ साली अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या चिपळूण तालुका अंतर्गत सोशल मीडिया प्रमुख हे पद मिळाले. याच कामाची पोचपावती म्हणुन मध्यप्रदेश येथील भोपाळ मध्ये २०१९ मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्लोबल आचिवमेन्ट हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कडव हे अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माते महामंडळाच्या सांगली जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून कामकाज पाहत असून आपल्या प्रसाद के.न्यूज ह्या न्यूजपोर्टल च्या कामात व्यस्त आहेत. कडव यांना आतापर्यंत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्या कडून कोविड योद्धा म्हणून सन्मानपत्र, जनजागृती सेवा समिती, बदलापूर तर्फे कोविड योद्धा सन्मानपत्र तसेच जनकल्याण समिती कडून पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामासाठी आदर्श पत्रकार म्हणुन सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रसाद कडव हे सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत. आतापर्यंत त्यांनी समाजातील कोविड काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या शासकीय अधिकारी, डॉक्टर ,सरपंच, समाजसेवक अशा विविध क्षेत्रातील महत्वाच्या जबाबदारी पार पाडणाऱ्या व्यक्तींना कोविड योद्धा सन्मान पत्र तथा सन्मान चिन्ह प्रदान करून त्यांना सन्मानित केले आहे. प्रसाद कडव याना मिळालेल्या आदर्श पत्रकार पुरस्कारामुळे शहरातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.