
नांदगाव : नुकत्याच झालेल्या नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल हा एकतर्फी लागला असून आमदार सुहास (अण्णा) कांदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व १५ ग्रामपंचायतींमध्ये शिंदे गटाला सत्ता मिळविण्यात यश मिळाले आहे. आज झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या दमदार विकास कामांच्या जोरावर तालुक्यातील राजकीय वर्चस्व सिद्ध झाले आहे. या विजयाचा जल्लोष आज आमदार सुहास कांदे यांचे नांदगाव संपर्क कार्यालयात करण्यात आला. सर्व विजयी सरपंच व सदस्यांनी संपर्क कार्यालयात येऊन गुलाल उधळत जल्लोष साजरा केला. सर्व उपस्थितांचा सत्कार ही करण्यात आला. आमदार सुहास आण्णा कांदे यांनी नव निर्वाचित सरपंच व सदस्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
