
नांदगाव : नांदगांव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाचे निर्विवाद वर्चस्व
नुकत्याच झालेल्या नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल हा एकतर्फी लागला असून आमदार सुहास (अण्णा) कांदे यांच्या नेतृत्वाखाली १५ पैकी १४ ग्रामपंचायतींमध्ये शिंदे गटाला सत्ता मिळविण्यात यश मिळाले आहे.अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टांगणीला होत्या अशातच राज्यभरात ७५०० पेक्षा जास्त ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. नांदगाव तालुक्यातील एकूण १५ ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुका पार पडल्या या निकालात पंधरा पैकी १४ ग्रामपंचायतीत शिंदे गटाने बाजी मारली आहे. नांदगाव तालुक्यात आमदार सुहास अण्णा कांदे यांनी विकास कामांचा सपाटा लावलेला असून तालुक्यात विकास पर्व सुरू आहे. याचाच परिणाम आजच्या ग्रामपंचायत निकालातून दिसून आला. आज झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या दमदार विकास कामांच्या जोरावर तालुक्यातील राजकीय वर्चस्व सिद्ध झाले आहे.या विजयाचा जल्लोष आज आमदार सुहास कांदे यांचे नांदगाव संपर्क कार्यालयात करण्यात आला. थेट जनतेतून सरपंच पदावर निवडून आलेले राजेंद्र सयाजी पवार नागापूर, मंजुषा जीवन गरुड पिंपरखेड, सुनिता कांतीलाल चव्हाण कसाबखेडा, शरद अशोक काळे धोटाणे खुर्द, भिका ठका बिन्नर शास्रीनगर यांचे सह ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र देशमुख, सुधीर देशमुख, अनिल काळे यांचा सत्कार करण्यात आला. सर्व विजयी सरपंच व सदस्यांनी संपर्क कार्यालयात येऊन गुलाल उधळत जल्लोष साजरा केला. आमदार सुहास अण्णा कांदे यांनी नव निर्वाचित सरपंच व सदस्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख किरण देवरे, गुलाब भाबड, नंदू पाटील युवा सेना तालुकाप्रमुख सागर हिरे, शहर प्रमुख सुनील जाधव,आय्याज शेख, प्रकाश शिंदे, महेंद्र गायकवाड आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
