
मनमाड : आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या नेतृत्वात धोटाणे खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच पदासाठी शरद अशोक काळे विजय झाले तसेच कसा बसखेडा ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी सौ. सुनीता कांतीलाल चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली असून सर्व सदस्यांचा विजय झाला आहे. सर्व विजयी उमेदवारांचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी अभिनंदन केले.सर्व विजयी उमेदवारांनी आमदार संपर्क कार्यालय नांदगाव येथे भेट दिली या पयाप्रसंगी जिल्हाप्रमुख किरण भाऊ देवरे, गुलाब भाऊ भाबड, आनंद शेठ चांडक, यांनी गुलालाची उधळण करत पुष्पहार व शाल देत सर्वांचा सत्कार केला. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
