
मनमाड : आमदार सुहास आण्णा कांदे यांचा सुरू असलेला विकासात्मक सुसाट प्रवासा सोबतच सामाजिक जबाबदारी पाहता सांस्कृतिक सामाजिक आरोग्य संबंधित विविध उपक्रम सातत्याने सुरू आहेत, जनतेला या आधी असे धडाडीचे नेतृत्व कधीच पाहायला मिळाले नाही आणि म्हणुच जनता मनोमन खुश दिसत आहे, सौ.अंजुमताई कांदे यांच्या नेतृत्वात महिला आघाडी मतदारसंघात विविध भागातील महिला वर्गास प्रत्यक्ष जाऊन भेटत आहेत आणि त्यांच्या समस्या सोडविण्यावर भर देत आहेत, यात स्वतः ताई अग्रेसर असतात.सौ.अंजुमताई कांदे यांनी नांदगाव येथील गुलजार वाडी परिसरातील महिला, नागरिकांशी संवाद साधला. त्यांची अडी अडचणी समजून घेतल्या, लवकरच विविध समस्यांचे निराकरण केले जाईल असा शब्द ही दिला.या प्रसंगी शहर प्रमुख रोहिणी मोरे, समन्वयक भारती बागोरे,फरजाना मॅडम, रिजवाना शेख, महेजबिन निहाल शेख, रहेणुमा फाऊंडेशन चे आय्याज शेख व इतर सदस्यांसह परिसरातील बांधव भगिनी उपस्थित होते.
🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
