तिसगाव ग्रामपंचायत निवडनुकित जनसेवा पँनलला ११ जागा तर सत्ताधारी आदर्श पँनलला ७ जागा,चाळीस वर्षाच्या एकहाती सत्तेला लगाम!

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)
जिल्ह्यातील राहुरी- पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील अतिशय महत्त्वाच्या म्हणून संबोधल्या जाणाऱ्या तिसगाव ग्रामपंचायतीच्या निवडनुकी मध्ये सत्तांतर होउन चाळीस वर्षे एकहाती असलेल्या सत्तेला लगाम बसला आहे.बाळासाहेब लवांडे आणि इलियास शेख सर यांनी जनसेवा ग्रामविकास पँनलच्या माध्यमातून तिसगाव ग्रामपंचायत निवडणूक लढवली त्यामध्ये त्यांच्या जनसेवा पँनलला सरपंचा सह आकरा जागेवर विजय मिळाला.सत्ताधारी आदर्श पँनलचे जेष्ठनेते आणि पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील लवांडे यांच्या पँनलला सात जागेवर समाधान मानावे लागले. सरपंच पद हस्तगत करण्यात विरोधक यशस्वी झाले. आणि या निवडणुकीत न भुतो न भविष्यती असा इतिहास घडला.जनसेवा पँनलचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे-वार्ड क्र.१ मधून फरहद रियाज शेख(२३६मते), वार्ड क्र.दोन मधून पठाण बिसमिल्ला कय्युम(३०२मते), संगिता गोरक्ष गारुडकर(३३७मते),मुमताज मुस्तफा शेख(२९८मते),वार्ड क्र.३मधून मगर पंकज राजेंद्र(२९६मते), ससाणे काशिनाथ माधव(३२०मते), शेख रजिया लतिफ(२५२मते), वार्ड क्र.६ मधून नरवडे कल्पना रमेश(४६६मते), पठाण सिकंदर जलाल(५०४मते), सुरेखा बाळासाहेब लवांडे(५०४मते), आदर्श पँनलचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे-वार्ड क्र.१ भुजबळ अमोल रामनाथ(१९२मते),वार्ड क्र.४ वाघ प्रदिप रावसाहेब(४६७मते),काशिनाथ राधाकिसन लवांडे(५९०मते), शिंदे छाया बाळासाहेब (४७९मते),वार्ड क्र.५ साळवे प्रमोदिनी सचिन(४०७मते), थोरात अश्विनी सागर(३७०मते),वाघ गिताराम रंगनाथ(३२१मते) आणि जनसेवा च्या सरपंच पदाच्या उमेदवार मुनिफा इलियास शेख यांना(२१४३मते) मिळवून विजयी झालेल्या आहेत त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार सौ भागुबाई भाउसाहेब लोखंडे यांना १९९० मते मिळाल्याने त्या पराभूत झालेल्या आहेत. इतर पराभुत झालेले उमेदवार पुढील प्रमाणे-नवनाथ भडके(१६१),पठाण राशदबी(१७३), पठाण अलिशाबी(७३), विधाते लता(६२),प्रतिभा भुजबळ(१७१),शेख रफिक(२८१),नांगरे नंदा(२८०),सुमय्या शेख(१८६),साळवे अक्षय(१३८),वाबळे अमोल(२४२),हुसेना पठाण(१९०), गारुडकर भरत(३८१),लवांडे सुरेश(२५६), खंडागळे सुजाता(३५८), कांचन परदेशी(१८१), नरवडे मनिषा(२११),पठाण कदीर(२६८),नरवडे गंगुबाई(३१५), लवांडे काकासाहेब(२८५),सय्यद चांदबी(२७९). जनसेवा ग्रामविकास मंडळाच्या विजयासाठी विक्रम मामा ससाणे, शेख बाबा पुढारी, मोसिनभाई शेख,बाळासाहेब गारुडकर, नारायण भडके,अण्णा पाटील लवांडे,प्रदिप ससाणे, इजाज शेख,चांदभाई तांबोळी, नारायण भडके,सादिक कुरेशी, हमिद सर,अमोल भडके,आनंद लवांडे, रिहाजभाई,अनिल रांधवणे,अरुण रायकर, जहांगीर भाई शेख,काका पाटील लवांडे, यांनी विषेश परिश्रम घेतले.नवनिर्वाचित सरपंच सौ. मुनिफा शेख म्हणाल्या की मी मुस्लिम समाजातील असुनही हिंदु बांधवांनी मला सरपंच म्हणून निवडून दिले त्या सर्व मतदारांच्या विश्वासाला मी तडा जाउ देणार नाही असे सांगितले. (प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here