
मनमाड : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेच्या स्वागतार्ह मनमाड शहरात सुरू असलेला आनंदोत्सवातील आज 5 वा कार्यक्रम प्रभाग क्रमांक 10 मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संपन्न झाला, आजचा होम मिनिस्टर कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा झाला.
या कार्यक्रमास प्रभागातील महिलांनी तुडूंब गर्दी केली होती, यात गृहिणी, बाल गोपाल तसेच वयोवृध्द मातांनी आवर्जून उपस्थिती नोंदवली तसेच कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घेत या कार्यक्रमाचा आनंद लुटला.या प्रसंगी करंजवण पाणी योजना कशी असणार आहे ,पाणी कसे येणार आहे यावर सविस्तर माहिती असलेली चित्रफित उपस्थित महिलांना दाखवली. विशेष म्हणजे या योजनेचे भूमिपूजन लवकरच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते होणार असून या पुढे मनमाड कर माता भगिंनिंसाठी २ बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहे ज्यात आपणास करंजवण मनमाड पाणी योजनेचे काम कसे सुरू आहे हे थेट तिथे जाऊन दाखवले जाणार असून यात आपला चहा नाश्ता व प्रवासखर्च आण्णा स्वखर्चातून देणार आहेत.लवकरच प्रत्येकाच्या घरात नियमित पाणी येणार या आनंदाने अनेक महिलांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना आण्णा व ताई यांचे आभार ही मानले.आज झालेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी करणाऱ्या स्त्रियांना सन्मानित करण्यात आले. विविध खेळातील प्रथम विजेत्यांना प्रत्येकी टिव्ही, डिनर सेट तसेच ट्रॉली बॅग देण्यात आली. सोबतच अनेक विजेत्यांना पैठण्या तर विविध बक्षिसे ही या वेळी महिलांनी प्राप्त केले. आजचा कार्यम यशस्वी करण्यासाठी शिवसेना, महीला आघाडी, युवासेना मनमाड शहर पदाधिकारी, शिवसैनिकांनी मेहनत घेतली.विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या महिलांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,नावे 1) सौ. कल्याणी खैरनार,(सिल्वर मेडल वेटलिफ्टिंग) (2) सौ. सायरा मोहम्मद खान,3) सौ. जनाबाई कांबळे 4) सौ. रेवती सुमंत जोशी : (सोशल वर्कर थापड बिल्डिंग) 5) सौ. अनिता मधुकर गोरे : (समाजसेविका ) 6) सौ. नीता मनोज गांगुर्डे (माता रमाई महिला अध्यक्ष जमदाडे चौक) 7) सौ. चौरसिया ताई (राम मंदिर महिला भजनी मंडळ) 10) सौ. स्नेहल (मुक्ताताई ) सद्गुरे, सामाजिक कार्यकर्ते, 11) सौ. जानवी मॅडम मेहानी (प्रिन्सिपल श्री डी वाय स्कूल) 12) सौ. अहेमदी चांद शेख (सोशल वर्कर 52 नंबर) 13) सौ. अरुणा गौतम जाधव (R.P. शहर संपर्कप्रमुख) 14) सौ. उषाताई खरात (समाज कार्यकर्ता) 15) सौ. संगीता ताई परदेशी (आरोग्य विभाग सेविका) 17 ) सौ. चामिलाबाई भास्कर वाघ (सामाजिक कार्यकर्ते ) 18) सौ. प्रतिभा संदीप पाटेकर,( सामाजिक कार्यकर्ते ) 19) सौ. अनुराधा चंद्रकांत माळवतकर ( सामाजिक कार्यकर्ते ): विशेष पुरस्कार: 20) सौ प्रांजली रवींद्र महाजन सामाजिक कार्यकर्ता, 21) सौ डॉक्टर अर्चना राठी वैद्यकीय क्षेत्र,यांना देण्यात आला,
