केज विधानसभा बीड आमदार सौ. नमिता अक्षय मुंदडा व चंद्रसेन मच्छिंद्र सोनावळे – कक्ष प्रमूख कल्याण शहर यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाली गरीब रूग्णास आर्थिक मदत

0

मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

कल्याण: लातूर येथील अश्विनी अक्सिडेट अँड न्युरो केअर सेंटर हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय ईलाज घेणारे रूग्ण पेशंट सौ. लीलावती सुग्रीव पडुळे यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून 50,000/- रूपयांचे अर्थ सहाय्य मंजूर करण्यात आले.महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, मंगेश चिवटे, राम राऊत – कक्ष प्रमूख महाराष्ट्र राज्य, रविंद्र ननावरे, सहकक्ष प्रमुख माऊली धुळगुंदडे – मंत्रालय टीम, केज विधानसभा बीड आमदार सौ. नमिता अक्षय मुंदडा व चंद्रसेन मच्छिंद्र सोनावळे – कक्ष प्रमूख कल्याण शहर यांच्या पाठपुराव्यामुळे व विनंती नुसार ही आर्थिक मदत गरजु व गरीब रुग्णास मिळाली असुन रुग्णाचे नातेवाईक व मित्र मंडळी कडुन मनापासून सर्वाचे आभार व समाधान व्यकत केले.मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांच्या सहकार्याने अशी मदत महाराष्टातील जनतेला विविध ठिकाणी गरजवंत रूग्णांना त्यांच्या रूग्ण सेवकांमार्फत होत आहे तरी जनतेने जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन हीच माहिती गरीब आणि गरजु रुग्ण व त्यांच्या कूटुंबा पर्यत पोहचवणे गरजेचे आहे !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here