
पुणे : सामाजिक न्याय विभागाच्या समाज कल्याण विभाग नाशिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने मा. आयुक्त समाज कल्याण विभाग प्रशांत नारनवरे तसेच बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या संकल्पनेतून समता पर्व साजरे होत आहे.त्या अनुषंगाने मा. सुंदरसिंग वसावे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महपरिनिर्वाण दिन अभिवादन कार्यक्रमाने समतापर्व सांगता कार्यक्रम पंचायत समिती येवला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. यावेळी विचार मंचावर उपस्थित मान्यवर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मार्गदर्शक म्हणून भगवान बच्छाव बोलत होते. “बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. माणसाने माणसाशी माणसासम वागावे हा विचार त्यांनी जगाला दिला. संविधान स्वातंत्र्य,समता, बंधुता, न्याय या मूल्यांची ओळख भारताला दिली. महिलांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान कायम समरणात ठेवणे आवश्यक आहे. त्याशिवाय समताधिष्ठित समाजाची निर्मिती होणार नाही. आपण सगळ्यांनी भारतीय होणे आवश्यक आहे “असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून येवला पंचायत समिती गटविकास अधिकारी उपस्थित होते.”समाजाला संविधान आणि बाबासाहेब यांच्या विचार, कार्य, आचरण लक्षात ठेऊन आपण त्यांचा विचार आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. असे विचार यावेळी त्यानी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केली.”यावेळी विचार मंचावर बालविकास प्रकल्प अधिकारी राकेश कोकणी, प्रशासन अधिकारी श्यामकांत साळुंखे,विस्तार अधिकारी आनंद यादव, भाऊसाहेब अहिरे,रवींद्र शेलार ग्रामसेवक संघटना जिल्हा सरचिटणीस यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन बार्टीचे येवला तालुका समतादूत चंद्रकांत इंगळे यांनी आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी भाऊसाहेब अहिरे यांनी केले. सांगता कार्यक्रमासास किरण मोरे, नूतन पाटील, दत्तात्रय सोनवणे, गोरख ढोकळे, पूनम घोडेराव, वंदना शिंपी, जयश्री सोनवणे, निलेश टकले, यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाशिक जिल्हा प्रकल्प अधिकारी प्रतिज्ञा दाभाडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच यशस्वीतेसाठी पंचायत समिती कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
