
नाशिक : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार नाशिक जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात व्हिडीओ प्रणाली द्वारे सहभागी झाल्या होत्या. कृषी महोत्सव हा शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. यावेळी उपस्थित सर्व लोकांना आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली, ज्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना विविध प्रकारे होऊ शकतो असेही त्या म्हणाल्या. यावेळी नाशिक पालकमंत्री मंत्री दादा जी भुसे,कृषी मंत्री अब्दुल सत्तार जी,महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष श्री नरहरी झिरवळ,आमदार सौ. सिमाताई हिरे आदींसह नागरिक उपस्थित होते.
