
मनमाड (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) उत्तर महाराष्ट्र युवक आघाडीच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त विश्वभुषण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार उत्तर महाराष्ट्र युवा नेते मा.वंदेशजी गांगुर्डे अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी युवा नेते गोरख चौधरी, अनिल शेठ गुंदेचा, संजयसेठ मुनोत, राजेंद्र धीवर, नाझभाई शेख, दिलीपशेठ बरडिया,आदीसह असंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
