सरकारच्या पठाणी विजबील वसुलीच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन,संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्याची खुर्ची जाळली,चार शेतकऱ्यांवर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)
शिंदे-फडणवीस सरकाच्या पठाणी विजबील वसुलीच्या विरोधात माझी ऊर्जा राज्य मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मीरी येथिल महावितरणच्या उपकेंद्र कार्यालया समोर धरणे आंदोलन धरण्यात आले होते.आंदोलनाच्या नोटिसा देऊनही अधिकारी वेळेवर हजर झाले नाही म्हणून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्याची खुर्ची पेट्रोल टाकून पेटवून देत महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देत नारेबाजी केली.संतप्त शेतकऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शांत केले. तो पर्यंत अहमदनगर हुन महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयंत पाटील हे घटनास्थळी हजर झाले होते त्यांनीही संतप्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.आमदार तनपुरे यांनी प्रत्येक शेतकरी पाच हजार रुपये भरणार नाहीत पण प्रत्येकी तिनहजार रुपये भरतील असे सांगितले पण महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ती मागणी फेटाळून लावत वरिष्ठांना विचारावे लागेल आसे सांगितले.हा सारा प्रकार झाल्या नंतर विजकर्मचारी संघटनेचे नेते रघुनाथ लाड साहेब यांनी तिसगाव,करंजी, पाथर्डी येथील वीजकेंद्रातील सर्व कर्मचारी घेऊन पाथर्डी पोलीसा सह मीरी उपकेंद्रात धाव घेतली. आणि मग सर्वांना विश्वासात घेउन निर्णय घेत थेट पाथर्डी पोलीस गाठले.मीरी उपकेंन्द्रात ड्युटीवर असलेले अधिकारी ऋषिकेश प्र.पाटील यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात गु.र.नं.११७४/२०२२ कलम ३४,४,१३५, ३२३,३५३,४२७, ४३५,५०४,५०६, प्रमाणे, आंदोलन करणारे शेतकरी सचिन नारायण होंडे (रा.राघुहिवरे ता. पाथर्डी),पोपट लक्ष्मण घोरपडे (रा.पाचुंदा,ता. नेवासा),अमोल अच्युतराव वाघ (रा.जवखेडे खालसा ता. पाथर्डी),वसंत रोहिदास वाघमारे(मीरी) या शेतकऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करावा म्हणून अनेक शेतकऱ्यांनी आ.तनपुरे यांच्या कडे आग्रह धरला आहे.या घटनेचे पडसाद संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात उमटले असुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आता जास्त प्रमाणात आक्रमक झाले आहेत.यावेळी पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे,पो.काँ.भगवान सानप,पो.काँ.अनिल बडे,पो.काँ.विजय भिंगारदिवे, पोलिस पोपट आव्हाड यांनी चोख बंदोबस्त ठेवून परीस्थिती नियंत्रणात आनली. (प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा, स्पेशल क्राईम रिपोर्टर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here