
येवला : 17 डिसेंबर 2022 रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारतीय बौद्ध महासभा या धम्म संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत नासिक येथे गोल्फ क्लब मैदान येथे धम्म मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. आणि त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हा अध्यक्ष आद.पवन भाऊ पवार यांच्या उपस्थितीत येवला मुक्तिभुमी. येथे वंचित बहुजन आघाडी चा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची महत्त्वपूर्ण अशी बैठक संपन्न झाली. या बैठकीचे अध्यक्ष स्थान पवन भाऊ पवार यांनी स्वीकारून पवन भाऊ पवार,बाळासाहेब शिंदे नाशिक जिल्हा महासचिव ,चेतन गांगुर्डे युवक आघाडी महाराष्ट्र सदस्य, विश्र्वदास भालेराव यांचा हस्ते महापुरुषांचा प्रतिमा पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी धम्म मेळावा विषयी मनोगत व्यक्त केले तसेच आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व कार्यकर्त्यांना धम्म मेळावा यशस्वी करण्याचे आव्हान करत मुक्तीभूमी हे आंबेडकर चळवळीचे माहेरघर असून नाशिक जिल्हा आंबेडकर चळवळीचे प्रेरणा स्रोत असल्याने आंबेडकरांचा विचाराने प्रेरित होऊन नाशिक येथील धम्म मेळावा यशस्वी करण्यासाठी कामाला लागा असे आव्हान यावेळी केले,बैठकीचे प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभेचे येवला तालुका अध्यक्ष आदरणीय भाऊसाहेब जाधव यांनी केले. तर सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस दिपक गरुड यांनी केले .यावेळी वंचित बहुजन महिला आघाडी चा रेखा साबळे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष,संगीता साबळे येवला शहराध्यक्ष , रंजना गाढे, सुजाता साबळे,मंगल लकारे शकुंतला लकारें, पंचशीला पानपाटील, लीलाबाई गरुड यांच्यासह सर्वच राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
