
मनमाड : नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी यांनी मनमाड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यावर जोरदार टीका करीत राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली, तर ऊस उत्पादकांसाठी उद्या पुणे येथे साखर आयुक्त कार्यालय मोर्चा काढण्यात असल्याची माहिती त्यांनी यावेळी तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपन्या शेतकरी यांच्या पीक विमा मंजूर करीत नाही, या विमा कंपन्या सरकारच्या दावणीला बांधले असून यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत आहे ,असे वक्तव्य करीत शेतकऱ्यांना मागील वर्षी झालेला बे मोसमी पाऊस आणि यावर्षी झालेली अतिवृष्टी यामुळे शेतकरी संपूर्णपणे संकटात सापडला आहे, राज्य सरकारने तातडीने त्यांना दिलासा द्यावा तो म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करावा असे त्यांनी मत मांडले आहे,
