Home Breaking News मनमाड महाविद्यालयात शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

0

मनमाड-येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समितीचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांना ६१ व्या पुण्यतिथी निमित्त महाविद्यालयात विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते भूगोल विभागाचे डॉ. गणेश गांगुर्डे यांनी पी.पी.टी द्वारे कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या जन्मापासून तर त्यांच्या सपूर्ण जीवन कार्याचा आढावा घेतला. पी.पी टी मध्ये कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या जीवन कार्यातील दुर्मिळ छायाचित्रांचा वापर करून सादरीकरण केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश झोत टाकला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ पवनसिंग परदेशी यांनी केले.या कार्यक्रमाप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रमोद आंबेकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य ज्योती पालवे, कुलसचिव श्री समाधान केदारे आदि  महाविद्यालयातील प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here