इंद्रगडी यात्रेनिमित्त स्वयंसेवकांनी मंदिर परिसरात केली स्वच्छतेची पाहणी.

0

सिल्लोड प्रतिनिधी( विनोद हिंगमिरे) सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील जगदंबा इंद्रगड देवीचे यात्रा उत्सव दिनांक सात नोव्हेंबर रोजी होणार असून या निमित्ताने घाटनांद्रा येथील 23 स्वयंसेवकांनी मंदिर परिसरात आज दिनांक पाच रोजी संपूर्ण परिसराची पाहणी केली व भाविकांची काही गैरसोय होऊ नये म्हणून नियोजन केले. यात सिल्लोड उपविभागीय अधिकारी कुलदीप जंगम व इतर अधिकाऱ्यांनीही शुक्रवार रोजी देवी इंद्रगडी यात्रा स्थळाची पाहणी केली व पदाधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या इंदरगाडी देवीची दरवर्षी कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला यात्रा भरते या यात्रेसाठी मराठवाड्याचा खानदेश भागातून सुद्धा 70 ते 80 हजार भाविक दर्शनासाठी दरवर्षी हजेरी लावतात. देवीचे मंदिर घनदाट जंगलात असून चहूबाजूंनी डोंगराळ भाग असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने या यात्रा साठी संस्थानासह घाटनांद्रा ग्रामपंचायत च्या वतीने तसेच गावातील 23 स्वयंसेवक तसेच पोलीस प्रशासनाचे यावेळी हजर राहणार आहे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी संस्थानाच्या वतीने तसेच घाटनांद्रा ग्रामपंचायत च्या वतीने पिण्याची पाण्याची व्यवस्था वाहन डोंगराच्या कडेवर तात्पुरते बांबूची संरक्षण पाण्याच्या तळ्याजवळ पोहोचणारे येणाऱ्या तरुणांची नियुक्ती इतर सुख सुविधा विषयी संस्थांवर स्वयंसेवकांनी यावेळी नियोजन केले यावेळी त्रिपुरारी पौर्णिमा ही दिनांक सात तारखेला सुरू होणार असून व आठ तारखेला चंद्रग्रहण असून त्यामुळे यात्रा ही दिनांक सात रोजी भरणार असल्याचे संस्थानाच्या वतीने सांगण्यात आले यावेळी कमिटी सचिव समाधान पाटील सदस्य रामराव सुलताने,रामजी मोरे स्वयंसेवक शिवा अप्पा कोठाळे,नत्थु मोरे,दिगंबर मोरे, राजाराम पालोदकर,एकनाथ सुलताने,विनायक मोरे गोरख मोरे युवराज मोरे, रामू मोरे,समाधान बावस्कर, गोपाल गवरे, शालिक खैरे,पी के अण्णा,यांनी जत्रा निम्मित नियोजन केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here