
सिल्लोड ( प्रतिनिधी विनोद हिंगमिरे) ऊस तोडीसाठी जाण्यासाठी पर्याय नसेल तर आपल्या मुलांना, भाऊ, आजोबा,आत्या इत्यादी नातेवाईकाकडे ठेवात्यांना शिक्षण घेऊ द्या,असे प्रतिपादन सिल्लोडचे गटशिक्षण अधिकारी अनिल पवार यांनी सांगितले सिल्लोड तालुक्यातील आधारवाडी येथे गुरुवार रोजी सायंकाळी सात वाजता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आधारवाडी तांडा येथे बाल रक्षक चळवळ अंतर्गत ऊस तोडणी साठी हंगामी स्थलांतरित मुलांसाठी पालक सभा आयोजित करण्यात आली.पालक सभेसाठी सिल्लोड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अनिल पवार साहेब,ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी राजीव फुसे साहेब, सिल्लोड केंद्राचे केंद्रप्रमुख दादाराव फुसे साहेब, तसेच आमठाणा केंद्राचे केंद्रप्रमुख जगदीश परदेशी सर उपस्थित होते.अनिल पवार साहेब यांनी बंजारा बोली भाषेत पालकांना संबोधित केले तसेच,राजीव फुसे यांनी अतिशय मार्मिक शब्दांत पालकांना मार्गदर्शन केले एकही मुल स्थलांतरित होणारं नाही याची खबरदारी घेतली जाईल असे पालकांनी सांगितले आहे.या कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक विलास नागरगोजे, विलास बनसोड,आधारवाडी तांडा, मुंडे, कृष्णा मिसाळ,वाडी को-हाळा शाळेचे चंद्रमणी शेजवळ, वाघ सर, राहुल राठोड शाळेतील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,व सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
