गोठीवली, नवी मुंबई मध्ये “खरे श्राद्ध” या सामाजिक लघुपटाचा मुहूर्त आणि चित्रीकरण संपन्न..

0

नवी मुंबई – (गोठीवली-प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर) आर्यारवी एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि महेश्वर भिकाजी तेटांबे लिखित-दिग्दर्शित सामाजिक प्रबोधनात्मक मराठी लघुपट “खरे श्राद्ध” चे चित्रीकरण नुकतेच गोठीवली, नवी मुंबई येथे पार पडले. याप्रसंगी गोठीवली गावचे सुपुत्र सत्यवान पाटील यांच्या शुभहस्ते लघुपटाच्या मुहूर्ताचा नारळ फोडण्यात आला. आईवडिलांच्या मृत्यूपश्चात त्यांचे श्राद्ध घातले जाते, त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून त्या पितरांना वाढी दाखविली जाते. पण ते जीवंत असतानाच त्यांचं मन जपलं, त्यांच्या आवडीनिवडी जपून त्यांना प्रेमाची, आदराची वागणूक दिली तर ते खरे श्राद्ध ठरेल..! श्राध्द म्हणजे श्रध्देने जे केले जाते ते. श्राध्द या विषयाचा खरा अर्थ निर्माता लेखक दिग्दर्शक श्री. महेश्वर भिकाजी तेटांबे यांनी त्यांच्या “खरे श्राध्द” या आगामी लघुपटातून मांडला आहे. तसेच श्राध्द घालण्यामागचे खरे शास्त्रीय कारणसुध्दा त्यांनी ऊत्कृष्टपणे मांडले आहे. या लघुपटात अलबत्या गलबत्या फेम सुप्रसिद्ध अभिनेता सनीभूषण मुणगेकर, प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक अनंत सुतार, सुरेश डाळे-पाटील, अनुष्का कामतेकर, , सत्यवान पाटील, निलेश घाडी, सचिन पाटील, मनिष व्हटकर आणि महेश तेटांबे आदी कलावंतांनी सहभाग घेतला. लघुपटाच्या छायाचित्रणाची जमेची बाजू अमर पारखे सॅप यांनी सांभाळली असून ग्राफिक्स डिझायनर मनिष व्हटकर, रंगभूषाकार प्रविण गिरकर, संकलक आणि प्रकाशयोजनाकार राजवीर जाधव यांचेही याप्रसंगी महत्वपूर्ण योगदान लाभले आहे. आणि लवकरच हा मराठी सामाजिक लघुपट “खरे श्राद्ध” रसिक प्रेक्षकांना प्रसिद्ध ओटीटी वाहिनीवर पाहायला मिळेल असे प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे.(धन्यवाद,आर्यारवी एंटरटेनमेंट,गुरुनाथ,तिरपणकर )
(पत्रकार)
९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here