पालिकेच्या शाळा क्र. ७१ मध्ये सत्रातील शेवटचा दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा डाॅ. ए. पी.जे. अब्दुल कलाम बालवाचनालयाचे उद्घाटन

0

नाशिक : हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र. ७१ मध्ये सत्रातील शेवटचा दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. दिपावलीचे औचित्य साधून शाळेत दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण शाळा व शालेय परिसर स्वच्छ करण्यात येऊन आकाशकंदिल, पणत्या, तोरणे, रांगोळी यांनी सुशोभित करण्यात आला. दिपोत्सवातील वसूबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज या सणांची आकर्षक मांडणी करण्यात येऊन विद्यार्थ्यांनी संबंधित सणांची धार्मिक, सामाजिक व शास्त्रोक्त माहिती इतरांना सांगितली.दिपावलीत फटाक्यांनी होणारे ध्वनिप्रदूषण, वायूप्रदूषण व दुष्परिणाम याबद्दल प्र.मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांनी मार्गदर्शन करत फटाकेमुक्त दिपावली साजरी करण्याचे आवाहन केले. तद्नंतर शिक्षिका रुपाली ठोक यांनी फटाकेमुक्त दिपावली साजरी करण्याची प्रतिज्ञा सर्व विद्यार्थी व शिक्षकांना दिली.आज १५ ऑक्टोबर “जागतिक हात धुणे दिन” असल्याने शिक्षिका रुपाली ठोक यांनी हात धुण्याचे महत्व सांगत विद्यार्थ्यांकरवी हात धुण्याचे प्रात्यक्षिक यावेळी करुन घेतले. यावेळी इ.१ अ च्या संपूर्ण वर्गाने वर्गशिक्षिका सुवर्णा थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हात धुण्याचे सुंदर गाणे सामूहिकपणे सादर केले.
१५ ऑक्टोबर दिवंगत राष्ट्रपती डॉ. ₹ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरी करण्यात आली. प्रतिमापूजन करुन कलाम साहेब यांना आदरांजली वाहण्यात आली. विद्यार्थ्यांनी भाषणांतून डॉ.कलाम साहेबांचा जीवनपट मांडला. तसेच शिक्षिका प्रमिला देवरे यांनी “डोळे उघडूनी बघा मुलांनो” हे विज्ञान गीत सुंदर आवाजात सादर केले. या कार्यक्रमाचे तयारी इ.६ वी च्या वर्गशिक्षिका प्रमिला देवरे व सुनिता धांडे यांनी केली.विशेष म्हणजे वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून डॉ. कलाम साहेबांना खरी आदरांजली म्हणून शाळेत एका स्वतंत्र, सुसज्ज अशा डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम बालवाचनालयाचे उद्घाटन शाळेचे प्र. मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी वाचनालयात तसेच आपापल्या वर्गात, व्हरांड्यात विविध पुस्तकांचे वाचन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्र.मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली किसन काळे, विनोद मेणे, प्रमिला देवरे, रुपाली ठोक, योगिता खैरे, सुनिता धांडे, कविता वडघुले, वर्षा सुंठवाल, शोभा मगर, किर्तीमाला भोळे, सुवर्णा थोरात, शैलजा भागवत, प्रविण गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here