
गुवाहटी : केंद्रीय मंत्री डॉ. भारतीताई प्रवीण पवार यांनी आसाम येथील गुवाहाटी मधील ईशान्येकडील वैद्यकीय संस्था AIIMS गुवाहाटी, NEIGRIHMS, शिलाँग आणि LGBRIMH तेजपूर यांच्या कामकाजाचा आढावा घेतला.यावेळी तिन्ही संस्थांच्या शिष्टमंडळाकडून अधिकृतरित्या पुरविल्या जाणाऱ्या नागरी केंद्रित सेवांची माहिती जाणून घेत पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेनुसार ईशान्येकडील लोकांच्या आरोग्यसेवेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही दिले.
