
नाशिक : दिनांक13 ऑगस्ट 2022 रोजी व्ही एन नाईक संस्थेच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने विशाखा समिती अंतर्गत आयोजित “सुरक्षा व्यवस्था आणि कायदा” या विषयावर प्राध्यापक वर्गा करीता व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.त्यावेळीं प्रमुख अतिथी म्हणून गीताताई गायकवाड यांनी विषयाची मांडणी करताना “स्त्री विरुद्ध पुरूष असे चित्र मिटवून स्त्री बरोबर पुरुष असे चित्र पुढे येणं आवश्यक असल्याचे सांगितले. विशाखा कमिटी पार्श्वभूमी (लैंगिक छळविरोधी कायद्याची पार्श्वभूमी) कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळविरुद्ध(प्रतिबंध बंदी आणि निवारण)कायदा 2013 कायद्यात नमूद व्याख्या तक्रार निवारण समितीची स्थापना रचना आणि कार्य कामाच स्वरूप तक्रारदार महिलेचे अधिकार व नियोक्त्याची कर्तव्य याविषयी सविस्तरपणे मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉक्टर आर आर सांगळे होते.श्रीमती नीलिमा साठे यांनी प्रास्तविक केले तर प्राध्यापिका सरिता देवकर यांनी प्रमुख अतिथीची ओळख करून दिली तर डॉक्टर मनीषा धिवरे यांनी आभार मानले यावेळी महिला पुरुष प्राध्यापक वर्गानी सक्रिय सहभाग नोंदविला होता,
